बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या तपासणीत ५६ जण कोरोनाबाधित आढळून आले असून कन्हेरी येथे झालेल्या रॅपीड अॅंटिजेन शिबीरात ११ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आजअखेर कोरोनाग्रस्तांची संख्या ३४३५ झाली आहे. काल देखील उपचार सुरू असलेल्या दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव बुद्रुक येथील ३८ वर्षीय महिला, गुनवडी येथील ५१ वर्षीय पुरूष, मळदरोड येथील ३३ वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील ५० वर्षीय पुरूष, शिवकाशीनगर येथील ५६ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ३९ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ६८ वर्षीय पुरूष, म्हाडा कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३८ वर्षीय पुरूष संभाजीनगर येथील ५० वर्षीय महिला, माळेगाव येतील २ वर्षीय मुलगा, मुक्ती व्हिलेज येथील ६७ वर्षीय पुरूष, पणदरे येथील २२ वर्षीय युवक, विद्यानगर इस्टेट येथील ४३ वर्षीय महिला, पारवडी येथील ३१ वर्षीय पुरूष, रुई येथील ३६ वर्षीय पुरूष, पवारवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष, ढेकळवाडी येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत तांदूळवाडी येथील ३१ वर्षीय पुरूष, जळोची रोड येथील ३७ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ४२ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील १७ वर्षीय युवक, सांगवी येथील ५० वर्षीय महिला, सांगवी येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत कटफळ येथील ६० वर्षीय महिला, रुई येथील ४५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, सावळ वीरकरवस्ती येथील ३० वर्षीय पुरूष, सूर्यनगरी साई सदन अपार्टमेंट येथील २४ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ३९ वर्षीय पुरूष, सहयोग सोसायटीजवळील ५६ वर्षीय पुरूष, पाटस रोड येथील २७ वर्षीय महिला, अशोकनगर येथील निबाजिया निवास येथील ४९ वर्षीय पुरूष, कसबा येथील ५७ वर्षीय पुरूष, आनंदनगर येथील झवेरी रेसिडेन्सी येथील ६३ वर्षीय पुरूष, जामदार रोड येथील ३१ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथील आरटीपीसीआर तपासणीत डायनामिक्स कॉलनी येथील ३४ वर्षीय पुरूष,जामदार रोड कसबा येथील ७० वर्षीय महिला, दुधसंघ वसाहतीतील ४४ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील तिघांचा समावेश
बारामतीतील तपासणीत इंदापूर तालुक्यातील तिघे जण कोरोनाबाधित आढळून आले असून यामध्ये लाकडी येथील ५२ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय पुरूष व कुरवली येथील ७० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.










