• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरातलं `बेडशीट` कुणावर उलटणार?

Maha News Live by Maha News Live
October 3, 2020
in सामाजिक, आरोग्य, राजकीय, राज्य, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : काही दिवसांपूर्वीच शासकीय अधिकाऱ्यांमधील वादास कंटाळून आरोग्य अधिकाऱ्याने रजा घेतली, मग दोन डॉक्टरांमधील वाद पोलिस ठाण्यात पोचला..मग आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्या..तरीही या वादावर पांघरूणच पडतेय..आता तर बेडशीट पडलेय..!


इंदापूरच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या इगोमध्ये आता नव्याने बेडशीट ची भर पडली आहे.. प्रकरण क्षुल्लक आहे असे कोणासही वाटेल,मात्र इंदापूरात अधिकाऱ्यांचा इगो किती मीटर अंतराचा आहे, १२० बेडशीटही अपुरी पडतील एवढा मोठा आहे.


दरम्यान पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी थेट तहसीलदारांनाच लक्ष्य केले असून तहसीलदार मग्रूरपणा करीत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. तहसीलदारांना वेळीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज द्यावी व कोविड खर्चाच्या गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या वादाची सुरवात पुन्हा झालीय ती, २९ सप्टेंबरच्या तहसील कार्यालयातील पत्राने..! हे पत्र वैद्यकीय अधिक्षकांच्या नावाने देण्यात आले असून यामध्ये ४० बेडशीट मागितले, ते दिले, पुन्हा मागितले ते दिले…एसडीआरएफ निधीतून जे देणे शक्य आहे, ते तहसील कार्यालय देत असतानाही वरीष्ठ कार्यालयाकडे वैद्यकीय अधिक्षक कार्यालयाने पत्रव्यवहार केल्यावरून प्रशासनाचे गाडे बिनसले आहे.

उपजिल्हा रुग्णालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, याला कारण घडले आहे ते रुग्णांचे बेडशीट!

जिल्हा रुग्णालयाने मागणी केलेल्या पत्रानुसार सर्व साहित्य तहसील कार्यालय पुरवत असून एकदाच वापरण्याची ४० बेडशीट दवाखान्याला पुरवली होती. ही बेडशीट बदलून दिली जाणार होती असेही कळवले होते. मात्र त्यानंतर वैद्यकीय अधिक्षक कार्यालयाने फोनवरून ४० बेडशीटची मागणी केली, त्यानंतर तात्काळ ४० बेडशीट उपलब्ध करून देण्यात आली. मात्र तरीदेखील वरिष्ठ कार्यालयास स्मरणपत्र देण्यात आल्याचा राग तहसील कार्यालयाला आला आहे.

यावरून २९ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयाने वैद्यकीय अधिक्षकांना खरमरीत पत्र लिहून आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत असून ही अतिशय गंभीर स्वरुपाची बाब असल्याचे स्पष्ट केले आहे.


उपजिल्हा रुग्णालयातील पूर्वीच्याच मनुष्यबळातील जे स्वच्छता कर्मचारी आहेत, त्याच कर्मचाऱ्यांकडून कोविड कक्षही स्वच्छ करून घ्यावा अशी सूचना तहसील कार्यालयाने दिली असून तहसील कार्यालय हे काही मनुष्यबळ पुरविणारे कार्यालय नाही, हे माहिती असूनही आपण कर्मचारी मिळावेत म्हणून मागणी करता, ती मागणी तुमच्या विभागास करावी, तसेच अगोदर मिळालेल्या साहित्याची खात्री करावी, तसेच आपले रुग्णालयात कोविड बेड ४० आहेत, त्याप्रमाणे एका बेडसाठी तीन बेडशीट या प्रमाणे ४० दिलेले आहेत, अजून ८० द्यावयाची आहेत, जादा बेडशीटसाठी सिव्हील सर्जनकडून मार्गदर्शन घेण्यात येईल, त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊनच पत्रव्यवहार करावा, अन्यथा आपल्या विरूध्द वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला जाईल याची नोद घेण्याचा इशारा वैद्यकीय अधिक्षक कार्यालयास दिला आहे.

गंमत म्हणजे तहसील कार्यालयातून वेळीच मदत मिळत नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत स्मरणपत्रे द्यावी लागतात ही कोंडी एकीकडे आरोग्य विभागाची होत असताना दुसरीकडे मेमो मिळतात, त्यामुळे दुहेरी कोंडीत आरोग्य विभाग सापडला आहे. एकूणच खरेतर इंदापूर तालुक्यात प्रशासकीय वाद हे मोठ्या खर्चाच्या गोष्टीसाठी व्हायला हवेत, मात्र इश्यू बेडशीटवरून होतात..सरपणाच्या खर्चावरून होतात हे काही इंदापूर तालुक्यासाठी बरे नाही.. आता यात चुक कोणाची हा विषय अलाहिदा, मात्र प्रशासनातील वाद रुग्णांपर्यंत पोचू देऊ नका म्हणजे मिळवली..नाहीतर उपचार घेणाऱ्या रुग्णालाच बेडशीट मागितलं म्हणून कोणी म्हणायचं की, माजलेत सगळे साले..!

Next Post
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्र्यांचा अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून भाजपला दणका

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूलमंत्र्यांचा अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून भाजपला दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group