महान्यूज: आजची गझल
जेव्हा पुन्हा तुला मी, भेटेन विठ्ठला
तेव्हा व्यथा जगाच्या, सांगेन विठ्ठला
होईल पूर्ण जेव्हा, इच्छा मनातली
मग बोलणे तुझे ही, ऐकेन विठ्ठला
खुडतात क्रूरतेने, गर्भात ज्या कळ्या
आयुष्य त्या कळ्यांचे, मागेन विठ्ठला
जर भेटली सवड अन्,आलास तू घरी
तर घाव काळजाचे, दावेन विठ्ठला
शेतातला बळी तू, झालास जर कधी
भाळावरील मोती, वेचेन विठ्ठला
गझलकार-निर्मला सोनी, अमरावती











