दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात दौंड शहर व पाटस, यवत व स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये प्राप्त झालेल्या अहवालात आज दिवसभरात फक्त 15 जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत.
शहरातील कोवीड सेंटरचा आज प्राप्त झालेल्या अहवालात 95 पैकी 7 जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह तर 88 जणांचे निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये 16 ते 75 वयोगटातील 1 महिला व 6 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. दौंड शहारात 4 व ग्रामीण भागात 3 असे एकूण 7 रूग्ण आढळले आहे. ही माहिती उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
यवत कोवीड सेंटर मध्ये काल बुधवारी (ता. 30 ) 64 जणांची तपासणी केली याचा अहवाल आज प्राप्त झाला असून 64 पैकी केवळ 3 जणांचा अहवाल पाँझिटिव्ह आला उर्वरीत 61 जण निगेटिव्ह आले आहेत.
यवत येथे 2, तांबेवाडी एक, असे एकुण तीन, 1 ते 60 वयोगटातील एक महिला व दोन पुरषांचा समावेश आहे. यवत उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ, शशिकांत इरवाडकर यांनी ही माहिती दिली.
स्वामी चिंचोली येथील कोवीड सेंटर मध्ये काल बुधवारी (ता.30 ) 23 जणांची तपासणी केली. यामध्ये रावणगाव येथील 52 ते 58 वयोगटातील एक महिला व एक पुरूष असे दोन जण कोरोनाबाधित आढळले आहेत.
पाटस येथील कोवीड सेंटर मध्ये आज (ता.1) 15 जणांची तपासणी केली. 15 पैकी 25 ते 47 वयोगटातील दोन पुरूष व एक महिला रूग्ण आढळले. पाटस येथे दोन, पडवी येथे एक अशा 3 जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह प्राप्त झाला आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश पाखरे यांनी दिली.










