बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीबरोबर कोरोनावर मात केलेल्यांना आणखी एक भीती घातली जातेय, ज्यांनी कोरोनावर मात केलीय, त्यांच्या शरीरात अॅंटीबॉडीज तयार झालेल्या आहेत. मात्र अगदी वैद्यकीय क्षेत्रातूनही ही अफवा पसरवली जातेय की, अॅंटीबॉडीज फक्त एक किंवा दोन महिने राहतात, पुन्हा कोरोनाचा झटका बसतो वगैरे.. यामुळे कोरोनामुक्त झालेलेही चिंतेत आहेत. प्रसिध्द संशोधक अभिषेक ढवाण यांनी यासंदर्भात केलेले विश्लेषण व निरीक्षण अत्यंत महत्वाचे आहे.
संशोधक अभिषेक ढवाण म्हणतात. अॅंटीबॉडीज कमी झाल्या म्हणजे पुन्हा धोका आहे का? आणि अॅंटीबॉडीज शरीरात आहेत, म्हणून तुम्हाला कोरोना होणारच नाही का? असे दोन प्रश्न आज अनेकांना सतावत आहेत. मात्र हे जाणून घेण्यापूर्वी अॅंटीबॉडीज, अॅंटीजेन आणि मेमरी सेल काय आहेत हे लक्षात घेऊ.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर आपले शरीर म्हणजे एक गाव आहे असे थोडा वेळ समजू. व्हायरस किंवा बॅक्टेरिया म्हणजे चोर असे समजा. यावरून तुमच्या लक्षात येईल की, यामध्ये शरीरात हे तीन घटक नेमके कसे काम करतात.
याचा व्हिडीओ येथे पहा किंवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर किंवा महान्यूज यु ट्यूब चॅनेलवर तुम्ही पाहू शकता
तर जेव्हा चोर तुमच्या गावात किंवा घराजवळ येतात, तेव्हा लक्षात येताच, तुम्ही तुमच्या परीने हुसकावून लावण्याचा प्रय्तन करता. आपले शरीरीही तसेच काम करते. सुरवातीला जेव्हा अचानक व्हायरस इन्फेक्शन होते, तेव्हा शरीर इमिटी इम्युनिटी म्हणजे प्रथम प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वापरून ते इन्फेक्शन कमी करण्याचा प्रय्तन करते. मात्र जेव्हा चोरांची संख्या जास्त असते, तेव्हा तुम्हाला त्यास हुसकावून लावता येत नाही. त्यावेळी तुम्ही पोलिसांना फोन करता. त्यासाठी पोलिसांचे नंबर शोधले जातात. मग पोलिसांना फोन केला जातो. मग पोलिस रस्ते शोधत-शोधत येतात. तुमचे घर शोधतात. यात वेळही काहीसा जातो. मात्र जेव्हा पोलिस येतात, ते तुमच्याकडे चौकशी करतात की, ते चोर कसे होते, कसे दिसतात वगैरे वगैरे.. मग पोलिस एक प्लॅन आखतात. त्या प्लॅनप्रमाणे कर्मचाऱ्यांची पथके तराय करतात आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने पाठवतात व दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस त्या चोरांना पकडतात.
आता चोर पकडले आणि गावातील परिस्थिती सुरळीत झाली की, पोलिसांचे काम संपते, ते आपापल्या पोलिस चौकीत जातात. अगदी तसेच आपल्या शरीराचेही आहे, हे चोर जसे, तसेच बॅक्टेरीया किंवा विषाणू तुमच्या शरीरात चोराप्रमाणेच घुसतात. अशावेळी जसे तुम्ही अगोदर चोराला हुसकावण्याचा तुमच्या परीने पहिला प्रयत्न करता. तसेच शरीरातील पेशी या विषाणूला संपविण्यासाठी प्रतिकार करतात. मात्र जेव्हा ते इन्फेक्शन जास्त प्रमाणात असेल, तीव्र असेल तर शरीर अॅडाप्ट इम्युनिटी म्हणजे दुय्यम प्रतिकारशक्तीला बोलावते. ती अॅडॉप्ट इम्युनिटी शरीरात घुसलेल्या विषाणूवरील अॅंटीजेन पाहते, त्याप्रमाणे अॅंटीबॉडी तयार करते. शरीरातील अॅंटीबॉडी जिथे जिथे अॅंटिजेन आहे, तिथे तिथे अॅंटीबॉडीचे कार्य करते आणि विषाणू संपवण्यास सुरवात करते. जसे चोराला पोलिस जिथे जिथे सापडतील, तेथून पकडतात, तसे अॅंटीबॉडीज देखील अंटीजेनला पकडून संपविण्यासाठी आपल्या शरीराला मदत करतात.
ज्यावेळी अॅंटीजेन म्हणजे शरीरातील इन्फेक्शन संपते, त्यानंतर अॅंटीबॉडीजचे काम राहत नाही. त्या देखील निघून जातात. मात्र जसे चोर पकडल्यानंतर गावातील परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर गावात आलेले पोलिस निघून गेले, तसेच शरीरातील अॅंटीबॉडीजही कमी होतात.
आता पहिला प्रश्न म्हणजे अॅंटीबॉडी कमी झाल्या म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झाली का? आता याच प्रश्नाचे उत्तर शोधायचे झाले, तर तेही लक्षात घ्या की, पहिल्यांदा जेव्हा गावात चोर येतात, तेव्हा पोलिसांचे नंबर शोधण्यासाठी तुमची धावपळ होते, त्यासाठी तुम्हाला शोधाशोध करावी लागते. तसे सुरवातीस विषाणू जो शरीरात घुसला होता, त्याची माहिती घेण्यात, त्याचे इन्फेक्शन शोधण्यात अॅंटीबॉडीजला देखील धावपळ करावी लागली, शोधाशोध करावी लागली. सुरवातीस अॅंटीजेन संपविण्यासाठी अधिक ताकद खर्च करावी लागली. त्यानंतर काम संपले व अॅंटीबॉडीज निघून गेल्या. मात्र जेव्हा दुसऱ्या वेळेस अशाच स्वरुपाचे विषाणूजन्य संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होईल, त्यावेळी जसे पुन्हा गावात चोर आल्यास तुम्हाला पोलिसांचा फोन शोधण्याची गरज नाही, तो तुमच्याकडे असतोच, त्यावरून फक्त लागलीच फोन करून तातडीने येण्याची विनंती करायची असते, तसेच पोलिसांनाही तुमच्या गावाचा, घराचा मार्ग माहिती असतो, ते पहिल्या वेळेपेक्षा लवकर पोचतात.
अगदी तसंच आपल्या शरीरात अॅंटीबॉडीज तयार होताना त्यातील काही पेशी या मेमरी सेल बनतात. त्या ते इन्फेक्शनची माहिती तयार ठेवतात. त्यामुळे दुसऱ्या वेळी जेव्हा इन्फेक्शन होते, त्यावेळी लागलीच या मेमरी सेल्स म्हणजे या पेशी लागलीच अॅक्टीव्ह होऊन अॅटीबॉडीज तयार करतात. पहिल्या वेळेपेक्षा त्या कमी कालावधीत अॅक्टीव्ह होतात. यााच अर्थ असा की, एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर तुमच्या शरीरात जोपर्यंत शरीर नॉर्मल सायकलमध्ये येत नाही, तोपर्यंत राहतात, जेव्हा शरीराची स्थिती सुरळीत होते, निरोगी बनते, तेव्हा त्या अॅंटीबॉडीजची गरज शरीराला उरत नाही, परिणामी अॅंटीबॉडीज कमी कमी होत जातात आणि त्या कमीही झाल्या पाहिजेत. कारण त्यांचे अस्तित्व सतत राहणेही ठिक नसते.
आता याचा अर्थ असा की, प्रतिकारशक्ती संपली असे होत नाही. पुढील वेळी त्या मेमरी सेल लक्ष ठेवून अगदी वेळेतच अॅंटीबॉडीज तयार करतात. या मेमरी टी किंवी बी सेल्स तुमच्या अॅंटीबॉडीज तयार करतात. त्यामुळे अॅंटीबॉडीज कमी झाल्या तरी मेमरी सेल कायम असतात.
दुसरा प्रश्न असा होता की, अॅंटीबॉडीज शरीरात आहेत, मग आपल्याला काहीच धोका नाही, तर तसेही समजण्याचे कारण नाही. ज्यावेळी अॅंटीबॉडीज शरीरात आहेत, तेव्हा आपल्याला इन्फेक्शन होणारच नाही असेही समजण्याचे कारण नाही. एक लक्षात घ्या. पहिल्या वेळी संसर्ग झाला, तुमच्या शरीराने अॅंटीबॉडीज तयार केल्या. ज्यावेळी पहिले इन्फेक्शन झाले, तेव्हा तुम्हाला काहीच इतर सहव्याधी नव्हत्या. त्यामुळे तुमच्या अॅंटीबॉडीज पटकन तयार झाल्या. त्यांनी संसर्ग कमी केला. मात्र कालांतराने तुम्हाला पुन्हा संसर्ग होणार आहे, अशावेळी तोपर्यंतच्या काळात जर तुम्हाला काही सहव्याधी जोडल्या गेल्या असतील, जसे की, रक्तदाब, मधुमेह किंवा इतर काही आजार असे नव्याने जोडले गेले असतील, तर पहिल्यापेक्षा धोका कमी राहील, मात्र धोका होणार नाही असे होणार नाही.
अॅंटीबॉडीज तयार होतील, मात्र सहव्याधी असतील, तर पहिल्या वेळी व्हायरल लोड किती होता यावरही ते अवलंबून राहणार आहे. कारण दुसऱ्यांदा अॅंटीबॉडीज शरीरात असतानाही व्हायरल लोड अधिक असेल आणि या मेमरी टी सेलचे उत्पादन तुलनेने कमी असेल, तर अॅंटीबॉडीज आहेत, म्हणून इन्फेक्शन होणार नाही असे होणार नाही. फक्त अॅंटीबॉडीज असल्याने त्यातून बरे होणे शक्य आहे. फक्त विलंबावधी वाढू शकेल, अर्थात अॅंटीबॉडीज निघून गेल्याने शरीराचा धोका वाढला असेही समजण्याचे कारण नाही, कारण शरीरात मेमरी सेल्स असतात. त्या तुम्हाला धोक्यातून बाहेर काढणार आहेत. हे लक्षात घेण्याची गरज आहे.











