महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
नेपाळ उत्तराखंडच्या कालापानी जवळ त्यांच्या हद्दीत सैनिकांसाठी स्थायी कॉर्टर आणि बराकी उभारत आहे.
नेपाळ वारंवार उत्तराखंड मधील कालापानी लीपूलेख आणि लिमपियाधुरा या भागांवर दावा ठोकत आला आहे. नेपाळचे हे पाऊल आश्चर्यकारक आहे, कारण नेपाळने या भागात कधीही सैनिक तैनात केलेले नाहीत.
या बराकी कालापानी पासून 13 किमी लांब चंगरू येथे बांधलेल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून भारत आणि नेपाळ मध्ये काही भागांवरून तणाव आहे.
नेपाळने कालापानी, लीपूलेख आणि लिम्पीयाधुरा या भारतीय प्रदेशाला आपले दर्शवत नवीन राजकीय नकाशा जाहीर केला होता. हे तीनही भाग उत्तराखंड च्या पिथोरगड जिल्ह्यात येतात, हे भारताने अनेकदा स्पष्ट केले आहे.
नेपाळचे गृहमंत्री राम बहादुर थापा यांनी शुक्रवारी चंगरू मध्ये हे बॅरक आणि कॉर्टर ची पायाभरणी केली. या बेरक मध्ये नेपाळ सशस्त्र पोलीस दलातील जवान राहतील.
थापा चंगरूच्या जवळील सीतापुल येथील लोकांशी बोलताना म्हणाले की, नेपाळच्या युवकांसाठी आर्म्ड पोलीस फोर्स मध्ये सहभागी होण्याची चांगली संधी आहे. कारण आर्म्ड पोलीस फोर्स विस्तार करण्याची योजना बनवत आहे.
या फोर्सचे प्रवक्ता राजू आर्यल म्हणाले की, आम्ही भारत-नेपाळ सीमेवर देखरेख करण्यासाठी चंगरू येथे बराकी उभारत आहोत.










