महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
रेल्वेसेवा बंद असताना हॉटेल सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या अनुषंगाने मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री राज्यातील औरंगाबाद पुणे मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते.
सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा बंद असताना हॉटेल सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाच्या अनुषंगाने मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी (29 सप्टेंबर )आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत एक टवीट केलं आहे.”#5 अनलॉक सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले की रेस्टॉरंट सुरू करणार आहेत तिथे काम करणार्या कामगारांची वाहतूक व्यवस्था काय?” असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे
याआधी काही दिवसांपूर्वी देशपांडे यांनी सर्वसामान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू करा या मागणीसाठी सविनय कायदेभंग केला होता.










