महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेपेक्षाही भारतात अधिक टॅक्स भरल्याचे वृत्त अमेरिकेतील वृत्तपत्राने दिले आहे.
पुण्यातील पंचशील रियालिटीशी झालेल्या करारानंतर हा कर भरण्यात आला आहे असेही यात म्हटले आहे. न्यूयॉर्क टाइम्स’ने टॅक्स रिटर्न ची आकडेवारी देत ही माहिती समोर आणली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत केवळ 750 डॉलरचा कर भरला आहे. तर भारतात यापेक्षा अधिक 1 लाख 45 हजार 400 डॉलरचा कर भरल्याचे यात म्हटले आहे.
मात्र अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वृत्त फेटाळले आहे. कायद्यानुसार अमेरिकेच्या अध्यक्षांना व्यक्तिगत वित्त विवरण देण्याची आवश्यकता नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्या 2016 यावर्षी फेडरल इन्कम टॅक्स भरला, तो अवघा 750 डॉलर्स होता असे वृत्त द न्यूयॉर्क टाइम्स’ने रविवारी दिले.
या वृत्ताला गेल्या वीस पेक्षा जास्त वर्षातील कर भरणा केल्याचा रिटर्न्स चा आधार घेण्यात आला आहे. व्हाईट हाऊस मध्ये ट्रम्प अध्यक्ष म्हणून आले. त्या त्यांच्या पहिल्या वर्षीही त्यांनी केवळ 750 डॉलर आयकर म्हणून भरले आणि त्यांनी गेल्या 15 पैकी दहा वर्षात आयकरच भरला नाही. त्याचे कारण सांगितले की, त्यांना उत्पन्न कमी झाले, त्यापेक्षा जास्त गमवावे लागले.











