दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात दौंड शहर व यवत येथील कोवीड सेंटर मध्ये प्राप्त झालेल्या अहवालात एकुण २७ जण नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. शहरातील कोवीड सेंटरचा आज प्राप्त झालेल्या अहवालात ९० पैकी १८ जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह तर ७२ जणांचे निगेटिव्ह आले आहे.
शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोवीड सेंटर मध्ये आज सोमवारी ( दि. २८ ) ९० जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ ते ७६ वयोगटातील ५ महिला व १३ पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दौंड शहारात १३ व ग्रामीण भागात ३ आणि राज्य राखीव दल गटात २ असे एकूण १८ रूग्ण आढळले आहे, ही माहिती उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ, संग्राम डांगे यांनी दिली.
यवत कोवीड सेंटर मध्ये काल रविवारी ( दि २७ ) ७७ जणांची तपासणी केली याचा अहवाल आज प्राप्त झाला असून ७७ पैकी ९ जणांचा अहवाल पाँझिटिव्ह आला. १२ ते ६५ वयोगटातील ५ पुरुष व ४ महिला यांचा समावेश आहे, यवत ६, भांडगाव, वाळकी, बोरीपार्धी या गावात प्रत्येकी एक असे एकूण ९ जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यवत उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ, शशिकांत इरवाडकर यांनी ही माहिती दिली.










