जालना : महान्यूज लाईव्ह
मोबाईलच्या आहारी गेलेली आजकालची मुलं किती हिंसक बनतील याचा काही नेम उरला नाही. जालना जिल्ह्यातील या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवले आहे. एका महिलेचा शेतात खून झाला होता. जेव्हा पोलिसांनी तपास केला, तेव्हा त्यांना धक्कादायक माहिती हातात आली आणि पोलीस देखील चक्रावून गेले.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी या गावामध्ये 25 मार्च रोजी मिराबाई उर्फ संध्या बांडारे या महिलेचा खून झाला होता. शेतामध्ये या महिलेचा डोक्यामध्ये दगड घालून खून करण्यात आल्याने त्याचा तपास सुरू होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीर्थपुरी पोलिसांनी केलेल्या तपासात शेजारच्या १३ वर्षाच्या मुलावर संशयाची सुई वळाली.
तेरा वर्षीय या मुलाने आपल्या हातातील मोबाईल महिलेने पाण्यात टाकला व मोबाईल खराब केला म्हणून ही महिला शेतात झोपली असताना तिच्या डोक्यात दगड घातला. याप्रकरणी महिलेच्या भावाने तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावरून तेरा वर्ष आणि सहा महिने वयाच्या या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.











