घटना आहे गुजरातमधील बनासकांटा भागातील डिसा येथील. येथे फटाके बनवणाऱ्या कंपनीच्या बॉयलर चा स्फोट झाला आणि त्यानंतर मोठा स्फोट होऊन 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
एक एप्रिल रोजी सकाळच्या वेळी घटना घडली. या घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी कामगारांना उपचारासाठी दवाखान्यात नेल्यानंतर आणखी 13 जणांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा डीसा येथील दीपक ट्रेडर्स या कारखान्यात 30 कामगार काम करत होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान व वाहने या ठिकाणी पोचली. यावेळी कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या.
याच स्फोटाचा आवाज फार दूरपर्यंत ऐकायला गेला. स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरल्याने नागरिकांनी या कंपनीकडे धाव घेतली. डीसा येथे ही घटना घडली. या ठिकाणी कारखान्याच्या या भागाचे मोठे नुकसान देखील झाले. भिंती आणि छप्पर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली देखील काही कामगार अडकले. दरम्यान प्रशासनाने या स्फोटाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
घटनेनंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. या कारखान्याला फटाके तयार करण्याचा परवाना होता की नाही याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. दरम्यान घटनास्थळी डिसाच्या उपजिल्हाधिकारी नेहा पांचाळ तसेच पोलीस निरीक्षक विजय चौधरी आणि जिल्हाधिकारी माहीर पटेल यांनी पाहणी केली.











