• Contact us
  • About us
Saturday, June 13, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीचा बंगळूरमध्ये खून करून मृतदेह सुटकेस मध्ये ठेवून पळून निघाला, वाटेत सोबत विष घेतलं.. राकेशला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

tdadmin by tdadmin
March 28, 2025
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पत्नीचा बंगळूरमध्ये खून करून मृतदेह सुटकेस मध्ये ठेवून पळून निघाला, वाटेत सोबत विष घेतलं.. राकेशला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : मुंबईत येथून एक महिन्यापूर्वी बंगळूर – कर्नाटक येथे राहण्यासाठी पत्नी गौरीसह गेलेल्या पत्नी राकेश याने हिची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पत्नी गौरीची चाकूने भोकसून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून तो बथरूममध्ये ठेऊन मुंबईच्या दिशेने पळून निघालेल्या आरोपी राकेश खेडेकर याला शिरवळ पोलिसांनी शिरवळ हद्दीत गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.

यावेळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या राकेशला शिरवळ पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर बंगळूर पोलिसांच्या त्याला ताब्यात घेतले. पत्नीचा खून केल्यानंतर पती राकेशने स्वतः विष प्राशन करुन जीवन सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिरवळ पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीअंती त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.

राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) असे आरोपी पतीचे नाव आहे तर गौरी सांबरेकर (वय 32) असे हत्येत मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश राजेंद्र खेडेकर (वय 36) पती आणि त्याची पत्नी गौरी सांबरेकर (वय 32) हे दोघे मुंबईत राहत होते.

महिनाभरापूर्वीच राकेश आणि गौरी हे दोघे बंगळुरुला राहायला गेले होते. हे दोघे दक्षिण बंगळुरुतील दोड्डकम्मानहल्ली परिसरातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. राकेश हा एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून व सध्या वर्क फ्रॉम होमचे काम करीत होता तर पत्नी गौरी जॉबच्या शोधात होती.

26 मार्च रोजी रात्री राकेश याच्याकडे पत्नी गौरी हिने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. दोघांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. नंतर गौरी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा पती राकेशने आपण आता राहत असलेल्या रूमचे डिपॉझिट भरलेले आहे. आपण जर रूम सोडली, तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत व येथे येण्यासाठी खूप खर्च झाला आहे. असे तिला समजावीत होता.

तरीही गौरी ही त्याचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. शेवटी पत्नी सौ गौरी हिने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन पत्नी गौरीचे मानेवर, गळ्यावर पाठीवर चाकूने वार केले व तिचा खून करून राकेश मुंबईकडे निघाला. यावेळी त्याला शिरवळ पोलिस ठाण्याच्या पोलीसांनी गुरुवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.

ही कामगिरी ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत कृष्णा नलावडे, पोलीस हवालदार कुंभार, नलावडे, धुमाळ, मोहरे पोलीस शिपाई दीपक पाले पवार व होमगार्ड याच्या पथकाने केली.

हत्येनंतर गौरीचा मृतदेह बॅगेत ठेवला…

गौरी जखमी अवस्थेत घराचे लॉबीमध्ये निपचिप पडली. त्यानंतर राकेशला तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाली. त्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यामध्ये पत्नी गौरीचा मृतदेह ठेवून बॅगेची चेन लावली व ती बॅग घरातील बाथरूम बाहेर नेऊन ठेवली. त्यानंतर 27 मार्च रात्री 12 वाजण्याच्या सुमारास राकेश त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याचे मालकीची कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बेंगलोर येथून रवाना झाला.

खून केल्यानंतर फोन करून वडिलांना दिली माहिती
पत्नीचा खून केल्यामुळे राकेशला टेन्शन आले. त्याने महाराष्ट्रातील कागल या गावी आल्यावर एका मेडिकल दुकानांमधून हार्पिक सनीफीनाईल व झुरळ मारण्याचे औषध घेतले. कोल्हापूर ते कराड येथे प्रवास करीत असताना राकेशने त्याचे बेंगलोर येथील इमारतीमधील खालचे मजल्यावर राहणाऱ्या इसमाला व मुंबईत राहणाऱ्या वडिलांना फोन करून गौरीचा आपण खून केला असून तिचा मृतदेह बॅगेत ठेवल्याची माहिती दिली.

खंबाटकी घाट उतरताच राकेशने कीटकनाशकाचे केले प्राशन

पत्नी गौरीची हत्या केल्यानंतर मुंबईला निघालेला राकेश सातारा जिल्ह्यतील खंडाळा तालुक्यातील खंबाटकीचा घाट उतरल्यावर शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळ महामार्गावर कार घेऊन आला. यावेळी त्याला केलेल्या खुनाचे टेन्शन आल्याने त्याने विकत घेतलेले सर्व कीटकनाशक व औषधे एकत्र करून प्राशन केले. त्यानंतर त्याला याचा त्रास होऊ लागल्याने राकेश कारमधून बाहेर येऊन रस्त्यावर बसला. राकेश याला पाहून एका दुचाकीस्वाराने त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने विषारी औषध पिल्याची माहिती दिली. दुचाकीस्वाराने हे एकटाच राकेशला तात्काळ त्याच्या कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

चौकशीत खून केल्याची दिली कबुली

यानंतर याची माहिती शेरवळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेशकडे अधिक चौकशी केली असता त्याने पत्नी गौरीचा खून केल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस हवालदार कुंभार यांनी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नलावडे जोगळेकर हॉस्पिटलमध्ये इतर पोलिसांसह दाखल झाले. त्यांनी राकेशकडून आवश्यक माहिती घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांना घडलेलया प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक शेख यांनी तात्काळ बेंगलोर येथे संपर्क करून गौरीचे खुणाबाबत खात्री केली. तसेच तेथील संबंधित वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशन इन्चार्ज व इतर संबंधितांचे फोन नंबर पोलीस निरीक्षक नलावडे यांना पुरविले व पुढील तपासकामी सूचना दिल्या.

खुनानंतर पळून जाऊन औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, पोलीस उपविभागीय अधिकारी फलटण विभाग फलटण श्री. राहुल धस यांना राकेशच्या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्यानंतर राकेशचे नातेवाईक व बेंगलोर येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना आरोपीबाबतची व उपचार बाबतची माहिती दिली. राकेशला अधिक उपचाराची गरज असल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल व त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारा करता दाखल केले.  बंगळूर येथील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी ससून हॉस्पिटल येथे जाऊन आरोपी राकेशल ताब्यात घेतले. आरोपी राकेश हा पळून जाण्याच्या व नंतर विषारी कीटकनाशके पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु त्याला शिरवळ पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत दवाखान्यात दाखल केले.

Next Post
तलाठी पंधरा हजार रुपये मागतोय; त्याचा बंदोबस्तच करतो..!

तलाठी पंधरा हजार रुपये मागतोय; त्याचा बंदोबस्तच करतो..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group