विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
क्षयरोग मुक्तीसाठी राबवल्या जात असलेल्या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायतींची टिबीमुक्त ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतींचा नुकताच सन्मान करण्यात आला.
जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात हा सत्कार सोहळा झाला. यामध्ये बारामती तालुक्यातील भिलारवाडी, जैनकवाडी, काळखैरेवाडी, कन्हेरी, खराडेवाडी, कोळवली, मासाळवाडी, मोराळवाडी व सावळ या नऊ ग्रामपंचायतींचा समावेश होता.
भोर तालुक्यातील वीरवाडी, गवडी, हिरडोशी, महूडेख खुर्द, माळवाडी, निगुडघर, वाडाणे, वारवंड या ग्रामपंचायतींचा समावेश होता, तर दौंड तालुक्यातील खामगाव, रोटी आणि वासुंदे या तीन गावांना हा सन्मान देण्यात आला. इंदापूर तालुक्यातील गोतंडी, कळस, कुरवली, पळसदेव, पिंपळे आणि रुई या गावांचा यामध्ये समावेश होता.
आंबेगाव तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असून डिंबे खुर्द, कुशीरे खुर्द, पाटण, असाणे, चपटेवाडी, देवगाव, जवळे, कुशिरे बुद्रुक, माळीण, पहाडदरा, पंचाळे बुद्रुक, फळोदे, पिंपरगणे, रानमळा, तळेकरवाडी, तिरपाड, वाळुंज वाडी या गावांचा यामध्ये समावेश होता. हवेली तालुक्यातील आंबी मणेरवाडी, वरदाडे, माळखेड, खामगाव मावळ, घेरा सिंहगड, निरगुडी, बकोरी, शिरसवाडी, किरकटवाडी व भुर्केगाव या गावांचा समावेश होता.
खेड तालुक्यातील बोरदरा, अखतुली अंबू, पराळे, शिवे, तिफन वाडी या गावांचा, तर मावळ तालुक्यातील ठाकूरसाई, लोहगड, केवळे या गावांचा यामध्ये समावेश होता. जुन्नर तालुक्यातील राळेगण, शिंदे, घंगाळदरे, पूर या चार गावांचा, तर पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी, आंबोळी, माळशिरस, नायगाव, चांबळी, धनकवडी, हरगुडे, काळदरी, केतकावळे, खेंगरेवाडी, पिंपळे, तोंडल, वीर, जेऊर व नावळी या गावांचा समावेश होता.











