इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय संघटनांचे पोलीस स्टेशनला निवेदन
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सुपे गावातील धनगर समाजाच्या मेंढपाळ कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी इंदापूर तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. याबाबत इंदापूर पोलिसांना लेखी निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सर्व पक्षीय सामाजिक संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मेंढपाळांवर केलेला हल्ला निंदनीय असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या निवेदनात म्हटले आहे कि, बारामती तालुक्यातील सुपे या गावात दि. 23 सप्टेंबर रोजी धनगर समाजातील देवकाते या मेंढपाळ कुटुंबावरती काही समाज कंटकांनी अमानुषपणे मारहाण करून जो हल्ला केला त्या समाजकंटकांवरती गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी विनंती सरकारला करण्यात आली आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे, पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, इंदापूर नगर परिषदेचे गटनेते कैलास कदम, प्रा.कृष्णा ताटे, आरपीआयचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे,वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष हनुमंत कांबळे, प्रकाश पवार, राहुल गुंडेकर, शिवराज भिसे,वसीम शेख, माऊली नाचन,नितीन आरडे,माऊली नाचन,पोपटराव पवार, हमीद आत्तार, आप्पा माने, राणी कोकाटे, विजया कोकाटे, जाकिर मोमीन उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड.राहुल मखरे म्हणाले की, मेंढपाळांवर मागील वर्षापासून सातत्त्याने हल्ले होत आहेत. 2011-12 साली इंदापूर बायपास जवळ आणि त्यानंतर मागील दोन तीन वर्षापूर्वी पाटस येथे हल्ल्याची घटना घडली. त्यानंतर धुळे येथे अमानुष कृत्य अशी घडना घडली. यासाठी भटक्या विमुक्त समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे तो प्रथम बदलला पाहीजे. जसे अनुसूचीत जमातींना ॲट्रॉसिटी चे स्वतंत्र संरक्षण आहे. त्यानुसार भटक्या विमुक्त जमातींना संरक्षण द्यायला हवे जेणेकरून अशा प्रकारांना आळा बसेल. पिस्तूल दिल्याने किंवा निषेध केल्यानर हे थांबणार नाही. शासकिय स्तरावर जनतेची मानसिकता बदलण्यासाठी मोहीम आखली पाहीजे. यासोबत 395, 498 यासोबतच ॲट्रॉसिटी च्या सुध्दा खोट्या केसेस होतात. कधी कधी पोलीस ही त्यास प्रोत्साहन देऊन खोट्या केस करतात. हे कुठे तरी थांबले पाहीजे. जनतेची मानसिकता बदलली तर पाहिजेच त्याही पेक्षा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी न बसवता त्यांना थेट जेल मध्ये पाठवले पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले.










