बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल तपासण्याही कमी झाल्या आणि कोरोनाचे रुग्णही कमी आढळले आहेत. जनता कर्फ्यूचे परिणाम दिसू लागले आहेत. अर्थात ज्या गावांमध्ये रॅपीड अॅंटिजेनचे कॅम्प होत आहेत, तेथे आढळणारे कोरोनाग्रस्त वगळता बारामती तालुक्यातील कोरोनाचा गुणाकार सध्या तरी लोकांनी रोखून धरलेला आहे असेच कालच्या तपासणीतील निष्कर्षांवरून म्हणता येईल. काल तपासण्यांमधून कोरोनाग्रस्तांची संख्या ५१ आढळली आहे. तर काल उपचारादरम्यान एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मुढाळे येथील ३८ वर्षीय पुरूष, रुई येथील ४ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ४६ वर्षीय महिला, मेडद येथील ७२ वर्षीय पुरूष, भिगवण रोड येथील ५८ वर्षीय महिला, ३४ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगी, ४ वर्षीय मुलगा, ३६ वर्षीय महिला, ४३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
कचेरी रोड येथील ५५ वर्षीय पुरूष, निंबूत येथील ३० वर्षीय महिला, ३३ वर्षीय महिला, ४४ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ३२ वर्षीय महिला, वाकी येथील ३९ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील २७ वर्षीय महिला, काटेवाडी येथील १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय अॅंटीजेन तपासणीत पिंपळी येथील ३८ वर्षीय पुरूष, साईनगर येथील २८ वर्षीय पुरकूष, एमआयडीसीतील २२ वर्षीय युवक, ४७ वर्षीय महिला, पेन्सिल चौक येथील ३६ वर्षीय पुरूष, सुपा येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी प्रयोगशाळेत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये संभाजीनगर, सूर्यनगरी येथील रोनक अपार्टमेंट मधील ४८ वर्षीय पुरूष, जामदार रोड कसबा येथील ६५ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी रणवरे इस्टेट येथील ४४ वर्षीय पुरूष, टीसी कॉलेज रोड मिशन कंपाऊंड येथील ४२ वर्षीय पुरूष, आयएसएमटी कॉलनीतील १८ वर्षीय युवती, निरावागज येथील ५५ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ५४ वर्षीय पुरूष, बाबुर्डी येथील ४० वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
येथील गिरीजा खासगी प्रयोगशाळेत कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३४ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे.
इंदापूर तालुक्यात तिघे जण कोरोनाबाधित
बारामतीतील विविध प्रयोगशाळांमधील तपासणीदरम्यान इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील ५८ वर्षीय पुरूष, भवानीनगर येथील २९ वर्षीय पुरूष व बेलवाडी येथील २८ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.











