मुंबई : महान्यूज लाईव्ह
आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावरून प्रार्थना स्थळावरील भोंग्यांना लागू असलेली आचारसंहिता स्पष्ट केली. दिवसातून सहा सहा वेळा अजान होते. मशिदीच्या परिसरात लहान मुले वृद्ध आजारी लोक राहतात. त्यांना त्याचा त्रास होतो. उत्तर प्रदेशात धरतीवर महाराष्ट्रातही भोंग्यावर बंदी आणणार का असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानुसार एकंदरीत या पुढील काळात भोंग्यांची मुस्कटदाबी निश्चित आहे. काही काळापूर्वी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी यासंदर्भात आवाज उठवला होता आता थेट मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिल्याने भोंग्यांचे आवाज आता स्थिर राहतील अशी स्थिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की कोणत्याही धर्माच्या प्रार्थनाकोणत्याहीस्थळावरील भोंग याची परवानगी ही पोलिसांकडून घ्यावी लागेल. परवानगी घेतली नाही, तर कारवाई होईल आणि परवानगी घेतल्यानंतर नियमानुसार ते वाजत असतील तरच ते प्रार्थनास्थळावर राहतील. अन्यथा ते जप्त होतील. दुसरी गोष्ट नियमानुसार ते वाजतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर असेल, त्यात कुचराई केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान फडणवीस यांनी असे सांगितले की, कोणत्याही प्रार्थनास्थळावरील भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत बंद पाहिजेत. सकाळी सहा ते रात्री दहा या काळात सकाळी 55 डेसिबल तर रात्री 45 डेसिबल या आवाजाच्या मर्यादेपेक्षा मोठ्याने वाजले नाही पाहिजेत. यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिलेले आहेत जर अधिक आवाजाने ते वाजत असतील, तर तातडीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला यातील अधिकार दिले आहेत, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे.
भोंग्यांच्या परवानगीबाबत फडणवीस म्हणाले, सरसकट कोणालाही आता परवानगी दिली जाणार नाही. जी परवानगी असेल ती एका ठराविक कालावधीसाठीच मिळेल. या कालावधीनंतर पुन्हा भोंगा लावायचा असेल, तर पुन्हा त्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. ज्या ठिकाणी 55 डेसिबल व 45 डेसिबल आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, तिथे पुन्हा भोंग्यांना परवानगी दिली जाणार नाही. तेथील भोंगे जप्त केले जातील.
याकरता त्या त्या भागातील पोलीस निरीक्षकाने संबंधित ठिकाणी प्रार्थनास्थळात जाऊन भोंग्यांची परवानगी घेतली का नाही हे तपासावे सगळ्या पोलीस ठाण्यांना मीटर दिलेले आहेत त्यामध्ये आवाजाची डेसिबल मोजता येते प्रार्थना स्थळावरील डेसिबल मोजून जर आवाज जास्त असेल तर सुरुवातीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवावे. त्यांच्यामार्फत कारवाई करावी व जे उल्लंघन करतील त्यांना पुन्हा परवानगी द्यायची नाही या स्वरूपाची कारवाई पोलीस निरीक्षकांनी करणे अपेक्षित आहे. त्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर असेल जर त्यात कुचराई झाली तर पोलीस निरीक्षकावर कारवाई होईल.











