बारामती : महान्यूज लाईव्ह
विविध क्षेत्रातील नवीन तरुण उद्योजकांना नवनिर्मितीची स्वप्न हातात द्यायची असतील तर अनुभवी उद्योजकांचा विस्तार झाला पाहिजे वाढत्या स्पर्धेत ते टिकले पाहिजेत आणि सर्वांना रोजगार प्राप्ती होईल अशा आदर्शवत उपक्रमासाठी बँका आणि संस्था एकत्र आल्या पाहिजेत युनियन बँक आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर संस्था या निमित्ताने एकत्र येत असल्याने ही आशा अधिक बळकट झाली असल्याचे मत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकंडवार यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी बारामतीत युनियन बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर बारामती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक, व्यापारी, शेतकरी व विविध क्षेत्रातील व्यवसायिक यांच्यासाठी ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व कृषी क्षेत्र या स्तरावर युनियन बँकेकडील विविध योजना सेवा सुविधा उद्योजकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्षीय भाषणात विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी युनियन बँकेचे विभागीय मुख्य प्रबंधक नवीन जैन, विभागीय प्रबंधक मयंक भारद्वाज,
एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत पाटील, डेप्युटी रिजनल हेड श्रीप्रसाद भालवणकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चरलचे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी, व्हाईस चेअरमन शिवाजी निंबाळकर, सुशीलकुमार सोमाणी, बँकेचे एम एस एम ई कर्ज विभाग प्रमुख अभिषेक कुमार, बारामती शाखाप्रमुख संजीव कुमार व चेंबरचे सदस्य जगदीश पंजाबी, सुरेश परकाळे, राहुल शहा, पुरण सैनी, शरद गोपाळे व इतर उपस्थित होते.
व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी यांच्या बँकिंग क्षेत्रातील प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व नवीन उदोजक यांना उभारी देण्यासाठी युनियन बँक प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन झोनल हेड नवीन जैन यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर नेहमी उद्योजकांचा पाठीशी उभे असून बारामती परिसरातील उद्योजकांचा विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचे अनुभव मिळावेत म्हणून व्याख्यान, शासन दरबारी उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न, विविध बँकेचे कर्ज मिळावेत म्हणून बँकिंग क्षेत्रातील तज्ञांची कार्यशाळा, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत उद्योजकांचा सन्मान आदी कामे करीत असताना उद्योजकांच्या हितासाठी नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने एमआयडीसी परिसरातील सर्व उद्योजकांना नेहमी सहकार्याची भूमिका राहणार असल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत पाटील यांनी सांगितले तर विविध कर्ज प्रकरणातील मंजुरीची पत्रे यावेळी मान्यवरांचा हस्ते देण्यात आली व बँकेच्या विविध उपक्रम, कर्ज योजना, सेवा, सुविधा आदींची माहिती रिजनल हेड मयंक भारद्वाज यांनी दिली.
यावेळी विद्याधर काटे आणि मोनिका सुर्वे या बँकेच्या ग्राहकांनी बँकेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री अनिल पाटील यांनी केले तर आभार श्रीप्रसाद भालवणकर यांनी मानले. हा उपक्रम यशस्व करण्यासाठी अश्विनी सुर्वे,अंबीकेश रंजन, रितेश तलवार, आशिष साळुंखे यांनी विशेष नियोजन केले.











