• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदापूरला कावेरी खाडे ज्याच्यासाठी पैसे मागत होती, तो साहेब कोण? खरंच होणार का उलगडा? न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलीस कोठडी!

tdadmin by tdadmin
March 2, 2025
in सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
चार वर्ष अर्ज करूनही रस्ता मिळेना, शेतकरी वैतागला.. अन् त्या बाईला लाच मागायला थोडीही लाज वाटली नाही! इंदापूरात महिलेला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

इंदापूर : महान्यूज लाईव्ह

इंदापूर तालुक्यातील इंदापूर तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे या महिलेला शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती तिला इंदापूरच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. संभाषणामध्ये साहेबांसाठी आणि तिच्यासाठी तिने पैसे मागितले होते. आता हा साहेब कोण? याचा तपास करायचा आहे!

इंदापूर तालुक्यातल्या भांडगाव येथील शेतकऱ्याच्या रस्ता प्रकरणात लाच मागणाऱ्या कावेरी खाडे हिला पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. यामध्ये तपासादरम्यान तिने स्वतःसाठी आणि साहेबांसाठी पैसे मागितले होते. आता यातील ज्याच्याकडे निम्मे पैसे जाणार होते, तो साहेब कोण? हे तपासायचे असल्याने विशेष सरकारी वकील एडवोकेट प्रसन्न जोशी यांनी जिल्हा न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांच्याकडे अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. 

त्यावरून न्यायाधीशांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आता तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणि पोलिसांनी करायचा आहे. हा खरोखरच मनापासून तपास होणार का आणि खरोखरच यातील साहेब समोर येणार का? हे या दोन दिवसात समजेल. बऱ्याचदा लाचखोरीत अडकलेल्या सापडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुढील तपासातून समोर येत नाही, मात्र इंदापूरच्या प्रकरणात लाचखाऊ बाई बरोबर लाचखाऊ साहेब देखील सापडणार का? याची आता उत्सुकता आहे. 

या घटनेची पूर्वपिटिका अशी आहे, भांडगाव येथील शेतकरी हनुमंत मदने यांच्या वडिलांची एक एकरच्या आसपास जमीन आहे. त्या जमिनीत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन २०२० पासून तहसीलदारांकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देणेबाबतची प्रक्रिया बाकी होती. त्यांनी शेतीसाठी रस्ता मिळावा, म्हणून सन २०२० मध्ये इंदापूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता.

एक वर्षापासून ते इंदापूर तहसील कार्यालयात रस्ता मिळावा म्हणून अधिकाऱ्यांना भेटत होते. मात्र हेलपाट्याशिवाय पदरात काही पडत नव्हते, म्हणून त्यांनी सहाय्यक महसूल अधिकारी कावेरी खाडे हिला पुन्हा भेटून आपली कैफियत मांडल्यानंतर तिने ५० हजार रुपये द्या, तुमचे काम होईल म्हणून सांगितले.

मात्र या शेतकऱ्याने माझी शेती पडीक आहे, त्यामुळे मला एवढे पैसे द्यायला जमणार नाही असे खाडे यांना सांगितल्यानंतर शेवटी २५ हजार रुपयांवर तडजोड ठरली. मात्र चार वर्ष रस्त्यासाठी हेलपाटे मारून पदरी निराशाच मिळालेल्या व पैसेखाऊ प्रशासनाच्या तगाद्याला कंटाळून या शेतकऱ्याने नाईलाजाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली, तेव्हा खाडे या महिलेने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खात्री करून आज इंदापूर तहसील कार्यालयात सापळा रचला आणि लाच स्वीकारताना कावेरी खाडे हिला रंगेहाथ पकडण्यात आले होते.

Next Post
गार- बेटवाडीच्या सरपंचपदी वैशाली येडे यांची बिनविरोध निवड!

गार- बेटवाडीच्या सरपंचपदी वैशाली येडे यांची बिनविरोध निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group