दौंड, महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील गार बेटवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदावर वैशाली सतीश येडे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. गार बेटवाडीच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी वैशाली सतीश येडे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन दौंड मंडल अधिकारी कमलीवाल आणि ग्रामसेवक निंबाळकर यांनी कामकाज पाहिले.
याप्रसंगी उपसरपंच संभाजी होले, सुलभा गावडे,राणी भुजबळ, लता नांदखिले, नथु पासलकर, रामदास सुर्वे, संतोष शितकल, फिरोज सय्यद, स्नेह निवंगुणे, मनीषा वायसे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच पद हे ओबीसी महिला राखीव असून गार बेटवाडी ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.











