• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा माणूस आहे की, मशीन? अन् मेमरी म्हणजे गुगल -बिगलची तर गरजच नाय..! 

tdadmin by tdadmin
February 28, 2025
in यशोगाथा, सामाजिक, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
हा माणूस आहे की, मशीन? अन् मेमरी म्हणजे गुगल -बिगलची तर गरजच नाय..! 

बापू जगताप, कांबळेश्वर बारामती. 

काही दिवसांपूर्वीचा किस्सा! एकजण गडबडीने आपल्या नातवाच्या दवाखान्याच्या कामकाजाच्या निमित्ताने मुसळेसाहेबांसमोर आला.. बहुदा दादांनी अगोदरच सूचना केली असावी.. पण समोरचं काम पाहत पाहत, आणखी कोणाचा तरी फोन घेत.. समोर पाहत, लागलीच आपल्या सोबतीच्या व्यक्तीला एक फोन लावायला लावला.. पलिकडून फोन उचलताच अदबीने त्यांच्याशी बोलत निरोप दिला.. पुन्हा मान खाली घालून राहिलेले समोरचे काम सुरू होते..!

आजोबा म्हणणाऱ्या त्या व्यक्तीने आपले काम सांगण्याच्या अगोदरच मुसळे साहेबांनी एका मिनिटात त्यांचे काम कसे झाले आहे, हे सांगत आता झालेला फोन त्यासाठीच होता. अजित दादांनी खास तुमच्यासाठी सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही अमुकतमुक डॉक्टरांकडे जा.. माझा निरोप द्या.. मी फोन केलेला आहे, ऑपरेशन होऊन जाईल.. असे उत्तर दिले आणि पुन्हा कामात डोकावले.. आपले काम झाल्याचा आनंद मानणाऱ्या त्या व्यक्तीने आभारही मानू नयेत, एवढं सहजगत्या कोण वागू शकतं? 

मुसळेसाहेबांना भेटून खाली उतरताना ती व्यक्ती सहजगत्या तिथे बसलेल्या लोकांना आपसूकपणे बोलून गेली… अवं, दादांकडे काम करायचं म्हणजे काय सोपं काम आहे का? पण हा माणूस आहे की, मशीन? काही बोलायच्या आत काम पण झालं! आन् मेमरी म्हणजे इचारूच नका, अवं गुगलचीबी गरजच पडायची नाय की वो..! 

काम को अंजाम दो! हे ब्रीदवाक्य घेऊन मागील जवळपास तीस वर्षांपासून जनसेवेत अविरत कार्यरत राहणारे अवलिया आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे! प्रत्येकालाच हवाहवासा वाटणारा हा माणूस रंगात रंगूनी रंग माझा वेगळा.. असंच काहीसं दाखवून  जातो.. आपलं या माणसाशी कैक वर्षांचं खूप जवळचं नातं आहे असं प्रत्येकाला भेटून झाल्यानंतर वाटत राहतं..!

आज राज्यातील राजकीय वातावरणात काम करणाऱ्या सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांना अजित दादांमुळे सुनीलकुमार मुसळे चांगलेच परिचित आहेत. एखाद्या अत्यंत कामात मग्न असलेल्या व कामाची तडप असलेल्या नेत्याच्या मागेपुढे सातत्याने सावलीसारखी उभे राहायचे हे काम सोपे नाही. मुसळेसाहेब यांचा कामाचा व्याप भला मोठा आहे. त्यांच्या कामामुळे केलेल्या मदतीमुळे हजारो लोकांच्या तोंडात त्यांचे नाव सहज येते.

मागील किमान पंधरा वर्षांपासून मी मुसळे साहेब यांना जवळून पाहत आहे. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रावहिनींच्या मार्गदर्शखाली ग्रामस्वच्छता अभियानात आम्ही दोघेही सहभागी होतो. अनेक कामे केली आणि विशेष आजही मी त्यांच्यासोबत अनेक कामात बरोबर असतो. प्रत्येकाला आपला वाटावा असा हा माणूस आहे. अर्थात हे व्यक्तिमत्व कमालच आहे. सोबत दोन फोन, आयपॅड, कामाची यादी, हायलायटर, दोन पेन, छोटी डायरी, आवश्यक ते सर्व साहित्य असे एक छोटे ऑफिस सोबत घेऊनच ते कार्यरत असतात. 

अजितदादांच्या कामाची पद्धत राज्याला माहित आहे. त्यांचे  PA म्हणून काम करणे म्हणजे माणूस तेवढा परिपूर्ण आणि updated पाहिजे. मुसळेसाहेब या दोन्ही बाबीतीत अगदी फिट्ट बसणारे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक मिनिटाला यांचा फोन वाजतो …येणारा प्रत्येक फोन ते घेतात त्याला उत्तर देतात. समोरच्या माणसाचे काम समजून घेऊन काम मार्गी देखील लावतात. 

आदरणीय दादांच्यामुळे आपले काम झाले आहे, हे ते समोरच्या माणसाला आवर्जून सांगतात आणि म्हणूनच काम बोलते, हे त्याचे वाक्य त्यांच्याच बाबतीत अगदी  तंतोतंत खरे ठरते. एकाच वेळी अनेक कामे चोख करणे हा मुसळेसाहेब यांचा हातखंडा आहे.

मला तर हा माणूस कधी झोपतो आणि कधी उठतो हे आजही समजलेले नाही. कारण लोकांना चोवीस तास availble असणे हे जेवढे वाटते तेवढे सोपे नाही. आजचा काळ कृत्रिम बुद्धिमतेचा आहे, मात्र मागील कोणत्या वर्षी काय झाले याची इत्यंभूत माहिती यांच्या कमालीच्या नैसर्गिक मेमरीत साठवलेली आहे. आजच्या तरुणपिढीला जे माहित नाही, ते updated तंत्रज्ञान मुसळेसाहेब यांनी आत्मसात केले आहे. 

वर्तमानपत्रातील लेख, राज्यातील विविध क्षेत्रातील लोकांचे फोन नंबर काहीही विचारा. यांच्याजवळ ते उपलब्ध असतेच. जुन्या नव्या गाण्यांचा अल्बम ते गजल आणि भैरवी पर्यंत सगळं संगीत क्षेत्र देखील यांचं तोंडपाठ आहे. माणूस आज दिवसेंदिवस कृत्रिम होत असताना, कृत्रिम जगावर अवलंबून असताना, नैसर्गिक बुद्धिमत्ता जपून आपले काम करणे हे यांच्याकडून शिकता येते.

अनेक वर्तमानपत्रातील चांगले वैचारिक लेख असोत, अथवा चांगली माणसांची मैफिल! दोन्ही त्यांच्याजवळ भरपूर आहे. लेखन असो अथवा वाचन, दोन्ही बाजू आजही जपणारे मुसळे साहेब यांचा आज वाढदिवस! काम को अंजाम दो म्हणत ते आजही कुठे तरी कामातच व्यस्त असतील!  अशा सर्वांग सुंदर माणसाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 

Next Post
वाईच्या मोहडेकरवाडी सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल!

वाईच्या मोहडेकरवाडी सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group