मुंबई : महान्यूज लाईव्ह
मंत्री धनंजय मुंडे यांना सलग दोन मिनिटे बोलता येत नाही असा बेल्स पालसी आजार झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेल्स पाल्सी हा अत्यंत दुर्मिळ आजार असून तो नेमका धनंजय मुंडे यांच्या वाट्याला आल्याने त्यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी वेगळीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांना सलग दोन मिनिटे नीट बोलता येत नसल्यामुळे कॅबिनेट बैठक आणि जनता दरबाराला उपस्थित राहिला नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या, आधी त्यांना डोळ्याचा आजार झाला. मग त्यांना कुठलातरी चायना वरून आलेला बेल्स पाल्सी नावाचा रोग झाला. नेमकं त्यांना काय झाले त्यांनाच विचारा. त्यांनी आता आराम करावा. माझी अशी मागणी आहे की, कोणत्याही नेत्याला इथून पुढे आजार झाला, तर फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या रूग्णालयात भरती न करता या सगळ्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करावं. म्हणजे खरंच यांना काय आजार झाला आहे ते समजेल असे करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.
मला यात काहीतरी गौडबंगाल वाटते आहे. ते आजारपणाचा बहाणा करत असतील असे मला यामध्ये दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर एवढे घोटाळ्याचे आरोप झाले आहेत की, आता लोकांसमोर जाण्यासाठी त्यांच्याकडे तोंड नाहीये, म्हणून तोंडाचा आजाराचा बहाणा करत असतील. मागे एकदा 11 डिसेंबर 2020 मध्ये आमच्यात भांडण झालं, तेव्हा ते मुंबईत आले आणि रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा देखील असाच पोटाचा कुठलातरी आजार त्यांना झाला होता असा टोला करुणा मुंडे यांनी लगावला आहे.











