विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, सोमेश्वरनगर येथे नुकत्याच झालेल्या आंतर व्हीपी विद्यार्थी कुस्ती स्पर्धेत अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचोलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवत विजयाचा ध्वज रोवला.
या स्पर्धेत सोहम ज्ञानदेव कदम (17 वर्षाखालील, 65 किलो गट), श्रेयस विशाल देवकाते (14 वर्षाखालील, 52 किलो गट), आणि श्रीकृष्ण श्रीराम अडसूळ (14 वर्षाखालील, 35 किलो गट) या तिघांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदके पटकावली. तसेच तेजल बाळू अडसूळ हिने 17 वर्षाखालील 50 किलो गटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. त्यांच्या या चमकदार यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक नवनाथ इंगळे यांनी मार्गदर्शन केले, तसेच कुस्ती प्रशिक्षक म्हणून कार्य करणारे बाळू तुकाराम अडसूळ यांनी विशेष प्रशिक्षण दिले. यशस्वी खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











