दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तहसिल कार्यालयात सोमवारी (दि १७ ) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी आणि नागरिकांच्या प्रलंबित शासकीय कामे आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ही माहिती दौंड प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला आणि तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.
दौंड तहसील कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन होईल. यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी संबंधित सर्व विभागांबाबतच्या अडीअडचणी सोडविण्याचे कामकाज केले जाणार आहे. तसेच अॅग्रीस्टॅक बाबत शेतकरी आयडी तयार करून देणे, पुरवठा ( शिधापत्रिका) विषयक EKYC करणे, विशेष अर्थसहाय्य योजनांबाबत EKYC करणे, आयुष्यमान भारत योजना नोंदणी करणे या सुविधा देखील नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच यापुढेही प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी अशास पद्धतीने तालुक्यातील विविध ठिकाणी लोकशाही दिन आयोजित करून नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कामकाज केले जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी लोकशाही दिनात सहभागी होऊन आपल्या समस्येचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन प्रांताधिकारी मिनाज मुल्ला आणि तहसीलदार अरुण शेलार यांनी केले.











