छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जेव्हा पशिक इरफान शेख पाशा याला ताब्यात घेतले, तेव्हा एक भीषण कहाणी समोर आली.. एका बोगस प्रेमाची! फक्त पार्किंग मध्ये गाडी लावता लावता देखील प्रेम होऊ शकतं! असलं बोगस प्रेम आयुष्यावर उठू शकतं याचा हा धडा..!
जालना येथील मोनिका निर्मळ या आयुष्यमान रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेच्या खून प्रकरणी व शेख इरफान शेख पाशा याला पोलिसांनी अटक केली आहे. पशेक याने मोनिकाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला असून तिचा मृतदेह शेतात पुरला.
जालना येथील मूळची मोनिका निर्मळ ही कामानिमित्त संभाजीनगरला ये-जा करत होती. यावेळी ती तिची दुचाकी छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनवर लावत असे. येथील पार्किंगवर काम करणाऱ्या या शेख बरोबर तिचे प्रेमप्रकरण जुळले आणि सहा फेब्रुवारी रोजी हे प्रेम प्रकरण संपले.
पशेक इरफान शेख पाशा याने 6 फेब्रुवारी रोजी मोनिका हिला लासुर स्टेशन येथील स्वतःच्या शेतात नेले आणि तिथे तिची हत्या केली. छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात गेलेली मोनिका परतली नाही, म्हणून तिच्या आईने तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पशेक पाशा पर्यंत शोध घेतला आणि त्यानंतर या भयानक प्रेम कहाणीचा शेवट समोर आला.











