बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील 2025 बॅचमधील 16 विद्यार्थ्यांची भारत फोर्ज कंपनीत निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ₹3 लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
निवड झालेले विद्यार्थी : बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन: महेश मुळे, ओंकार होळकर, ओंकार मांढरे. बीई मेकॅनिकल: पुष्कराज जाधव, ऋषिकेश मुसळे, अभय पानसरे, सौरभ शिंदे, प्रतीक शिंदे, सागर घाडगे, वैभव ढोणे. बीई इलेक्ट्रिकल: अभिजीत पवार, रोशन शिंदे, रोहन वाबळे, अजय भोसले, आदित्य तपकिरे, शुभम बोरकर.
सर्व विद्यार्थ्यांच्या या निवडीकरता सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे, महाविद्यालयाचे टीपीओ श्री. सुरज कुंभार, प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे, विभाग समन्वयक श्री. मयूर गावडे, श्री. शिवाजी रासकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आज त्यांना भारत फोर्जमध्ये संधी मिळाली आहे हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया प्रभारी प्राचार्य डॉ. लांडे यांनी व्यक्त केली.











