राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड. : लैंगिक वासनेपुढे आता नातेगोतेही कमी पडू लागली आहेत. भावाबहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील गिरीम येथे घडली. यामध्ये चुलत भाऊच तब्बल एक वर्ष अत्याचार करत होता. या प्रकरणी दौंड पोलीसांनी दोघा नराधमांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथील आरोपीच्या फोटो स्टुडीओमध्ये तसेच घरी मार्च २०२४ ते जुन २०२४ दरम्यान हा अत्याचार करण्यात आला. वायरलेस फाटा येथील हा आरोपी आणि सिंहगड फाटा धायरी येथे राहणारा व पिढीतेचा नात्याने चुलतभाऊ लागणारा आरोपी यांचा यामध्ये समावेश आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
हे नराधम पिडीता ही अल्पवयीन आहे हे माहित असताना ही जबरदस्तीने शरीरसंबध करीत होते. या पार्श्वभूमीवर वेळोवेळी शरीरसंबंध करून पिडीत मुलगी गर्भवती राहिली. तसेच या अत्याचारातून पिडीतेला एक मुलगी देखील झाली. मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगीतला, तर पिडीतेला व बहीणीला जिवे मारणेची धमकी या नराधमांनी दिली. अशी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी दौंड पोलीसांनी नराधमांच्या मुसक्या आवळल्या असुन बारामती विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके हे तपास करीत आहेत.











