विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड इंजिनिअरींग माळेगाव रोट्रेस २०२५ हा माजी विद्यार्थी मेळावा २६ जानेवारी २०२५ रोजी झाला. या मेळाव्याला ७०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना झालेला फायदा व अनुभव सांगितले. काही विद्यार्थी सध्या शासकीय सेवेत तसेच काहीजण खाजगी कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत, काही उद्योजक बनले तर काही विद्यार्थी परदेशात नोकरी करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्था व शिक्षक यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले तसेच संस्थेची सध्याचा झालेली प्रगती पाहून विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त यांना माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमपूरक उपक्रमांना मदत करण्याचे आश्वासनही दिले.
हा मेळावा शिवनगर विद्या प्रसारक मंडळ व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नातुन संस्थेच्या शरद सभागृहात पार पडला. या मेळाव्यास शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त माजी विद्यार्थी रामदास आटोळे, अनिल जगताप, वसंतराव तावरे, महेंद्र तावरे, रविंद्र थोरात, गणपत देवकाते, संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी विद्यार्थी अनिल तावरे, नितीन सातव, माजी संचालक व माजी विद्यार्थी शशिकांत तावरे, अविनाश देवकाते, तंत्रनिकेतनचे प्राचार्य संदीप शहा, सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त प्राचार्य संदीप शहा यांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी माळेगावचे संचालक नितीन सातव यांनी ऑटोमोबाईल विभागातील विद्यार्थ्यांना अधुनिक टेक्नॉलॉजी अवगत व्हावी या करीता कारभारी आण्णा सातव फाऊंडेशन तर्फे सुसज्ज अशी लॅब देण्याचे जाहीर केले, तसेच रामदास आटोळे व त्याच्या बॅचचे कॉलेजचे मित्र यांनी २५ कॉम्प्युटरची १ सुसज्ज लॅब देण्याचे जाहीर केले.
अभिजित देवकाते, मुख्य विश्वस्त जेजुरी देवस्थान जेजुरी यांच्यातर्फे गरजु विद्यार्थ्यांची फी भरण्याचे जाहिर केले. माजी विद्यार्थी निलेश जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोहाराची सोय केली होती. तसेच ज्ञानेश्वर रणवरे यांनी मदत जाहीर केली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी इथून पुढे मदत करण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पल्लवी वर्गे व आरती जैन यांनी केले, प्रास्ताविक डॉ. पी. एस. जाधव यांनी केले. तर आभार प्रा. आबासाहेब देवकाते यांनी मानले.











