बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमातून बाहेर पडण्यापूर्वी वार्षिक साडेतीन लाख रुपयांची पहिली ऑफर देत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारा त्यांची निवड करण्यात आली.
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयातील 2024 बॅचचे विद्यार्थी राजगौरी चव्हाण- बीई इलेक्ट्रिकल, स्नेहल राणे- बीई इलेक्ट्रिकल, श्रद्धा ठोंबरे- बीई सिव्हिल, शिवानी कापसे- बीई सिव्हिल, सोनल ठोंबरे- बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या पाच विद्यार्थ्यांची 3.5 पॅकेज देऊन महिंद्रा सस्टेन व महिंद्रा टेको या नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे.
हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सेंट्रल टीपीओ डॉ. विशाल कोरे, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुरज कुंभार यांनी नियोजन केले. तसेच या प्लेसमेंट करिता प्रा. मयूर गावडे, डॉ. रवी पाटील, प्रा. शिवाजी रासकर यांनी योगदान दिले. या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे तसेच सर्व प्राध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











