विक्रम वरे, बारामती
अलीकडं श्रीमंती मोजायची झाली तर घर किंवा आलिशान गाड्यांमध्ये आपण ती श्रीमंती मोजतो.. पण भूतदयेत देखील मोठी श्रीमंती असते आणि त्यातही ती शौक आणि छंद त्याचबरोबर जनावरांप्रती लळा असेल तर विचारायलाच नको..
बारामतीच्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नावाबांचा एक घोडा आला आणि त्याने साऱ्यांचेच डोळे विस्फारले.. कारण या घोड्याची किंमत ऐकून तुम्ही लेम्बोर्गिनी उरूस देखील विसरून जाल!
तब्बल अकरा कोटींचा घोडा! तुम्ही म्हणाल की त्याला काही सोनं लागलंय का? हो, त्याचा रंगच सोनेरी आहे.. चे डोळेही सोनेरी आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवाबाच्या दाव्यानुसार भारतामध्ये असा घोडा दुर्मिळच आहे.
बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात हैदराबादच्या नवाबाचा सोनेरी रंगाचा एक घोडा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असून हा घोडा पाण्यासाठी शेतकऱ्यांची व अश्वप्रेमींची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे या घोड्याची मालेगावच्या यात्रेत 11 कोटींची किंमत सांगितली होती.
हैदराबादचे नवाब अब्दुल बिनत्रिफ यांचा हा घोडा असून त्याच्या डोळ्याचा व शरीराचा रंग एक सारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे. हा घोडा आठ वर्षाचा असून पुष्करच्या यात्रेतून हा घोडा आणि घोडी आम्ही खरेदी केल्याचे नवाबांनी सांगितले. हा घोडा आम्ही फक्त मालेगावच्या यात्रेत नेला होता आम्ही शौक म्हणून घोडे पाळतो. इथे रणजीत पवार यांच्या खास आमंत्रणावरून आम्ही आल्याचे त्यांनी सांगितले. हा काठेवाडी घोडा असून या घोड्याची इतर वैशिष्ट्ये मात्र समजली नाहीत.
यात व्यतिरिक्त या प्रदर्शनामध्ये कर्नाटकच्या बन्नूर प्रांतातील जगप्रसिद्ध असलेल्या मेंढ्या देखील आले आहेत अत्यंत कमी उंचीच्या व अत्यंत देखण्या अशा या मेंढ्या चवदार मांसासाठी वापरल्या जातात. अगदी जगभरात या मेंढ्यांची निर्यात होते. बारामतीच्या प्रदर्शनात या मेंढ्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत.











