विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिर्सुफळ येथील विश्वास तानाजी आटोळे तर उपसभापतीपदी शिरष्णे येथील रामचंद्र शामराव खलाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बारामतीची बाजार समिती ही राज्यात पहिल्या क्रमांकाची बाजार समिती आहे.
बाजार समितीचे मावळते सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सभापती म्हणुन विश्वास आटोळे तर उपसभापतीपदी रामचंद्र खलाटे यांची निवड संचालक मंडळाच्या विशेष सभेत करण्यात आली. बारामती बाजार समितीला राज्यात प्रथम नामांकन मिळालेल्या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाल्याने नवनिर्वाचित सभापती आटोळे यांनी समाधान व्यक्त केले.
बारामती बाजार समितीच्या विकासात दादांचे मोलाचे योगदान असल्याने बाजार समितीचा राज्यात नावलौकीक असल्याचे मावळते सभापती सुनिल पवार यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांनी काम पाहिले. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे हे पक्ष निरीक्षक म्हणुन काम पाहिले.
यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दुध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष विक्रम भोसले, बाजार समितीचे सदस्य युवराज देवकाते, सतिश जगताप, विनायक गावडे, बापुराव कोकरे, अरूण सकट, दयावान महाडीक, दतात्रय तावरे, शुभम ठोंबरे, विशाल भोंडवे, शोभा कदम,प्रतिभा परकाळे, मिलिंद सालपे, संतोष आटोळे, नितीन सरक तसेच व्यापारी व हमाल मापाडी उपस्थित होते. समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.











