महायुती सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अखेर राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, या योजनेसंदर्भात शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, मात्र काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणी करत आहोत असे मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे.
तटकरे यांनी सांगितले की, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणारच आहे. पण काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत. या योजने संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. आधारकार्ड व बँक खात्यावरील नाव यांची माहिती जुळत नसल्याच्या तक्रारी होत्या, परंतु अशी परिस्थिती असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 9 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत डिसेंबरच्या हप्त्याची प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांची अनुदानाची रक्कम महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. काही महिलांकडून ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज आले होते. काही महिलांची लग्नानंतरची स्थलांतरेही झाली आहेत.
अर्थात चारचाकी वाहन ज्यांच्या नावावर आहे आणि तरी देखील त्यांनी अर्ज केला असेल, तर त्यांच्या नावाचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाणार आहे. मात्र आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत आढळली, तर त्या महिला या योजनेस पात्र ठरणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले असून आता महायुतीने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार 2100 रुपये कधी मिळणार याचीच उत्सुकता आहे.











