ज्ञानेश्वर रायते, बारामती
पुण्यात काही दिवसांपूर्वी हडपसर मध्ये नेहा ठाकूर या महिलेला मेनफिटेरॅमिन सल्फेट अर्थात टर्मिनची इंजेक्शन विकताना हडपसर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून एक लाख रुपये किमतीचे इंजेक्शन्स पोलिसांनी जप्त केले आहेत मात्र दिल्लीमध्येही असाच प्रकार घडला असून 35 वर्षीय निधी या नावाच्या महिलेला टर्मिनशी इंजेक्शन विकताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी कोटला मुबारकपूर येथे 26 डिसेंबर रोजी छापा टाकून या महिलेला पकडले होते.
ही इंजेक्शन्स औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 च्या शेड्यूल-एच अंतर्गत वर्गीकृत आहेत आणि NDPS कायद्यांतर्गत समाविष्ट नाहीत. याचा साठा देखील करता येत नाही आणि डॉक्टरांच्या डिस्क्रिप्शनशिवाय ही औषधे विकता येत नाहीत. जर बेकायदेशीर रित्या याचा साठा आढळला तर सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 22/23 अन्वये कारवाई केली जाते. या कलमांखाली किमान 3 वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे.
सध्या संपूर्ण देशभरात ही इंजेक्शन का विकली जात आहेत? आणि ती नेमकी महिलांमार्फतच का विकली जात आहेत? हे मात्र एक कोडे आहे, परंतु या गंभीर गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये महिला सक्रिय का झालेल्या आहेत? हे तपासण्याची गरज आहे. विशेष म्हणजे जिममध्ये जाणाऱ्या युवकांवर जाळे फेकून ही इंजेक्शन विकली जात आहेत.
अगदी तालुक्याच्या ठिकाणी देखील असणाऱ्या व्यायाम शाळा, जिम आणि फिटनेस सेंटर मध्ये जाणाऱ्या युवकांना गाठून त्यांना भुरळ पाडून या इंजेक्शनची सवय लावली जात आहे. अर्थात ही सवय लावण्यासाठी जिमचालक देखील कमिशनच्या मोहात याला बळी पडत आहेत असे देखील चित्र आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात ही इंजेक्शन विकली जात आहेत; त्यामुळे सावध होण्याची गरज आहे.
हे इंजेक्शन नशा म्हणून देखील घेतले जात असून वास्तविक पाहता प्रसुती होण्याच्या वेळी गर्भवती महिलेला अगदी क्षुल्लक मात्रेमध्ये म्हणजे 0.1 मिली एवढ्या प्रमाणामध्ये हे इंजेक्शन दिले जाते. मात्र जिममध्ये व्यायाम करणारी मुले या इंजेक्शनच्या प्रभावाखाली एवढी आली आहेत की, अगदी पाच ते दहा मिली एवढे प्रचंड प्रमाण एकाच वेळी ही मुले घेत आहेत आणि हा अतिशय मोठा धोका आहे. पुरुषी उत्साह वाढवण्यासाठी ही इंजेक्शन उपयोगी असल्याची जाहिरात केली जात आहे, मात्र हे धोक्याचे आहे.
या इंजेक्शनच्या सेवनाने शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून हृदयविकाराच्या तीव्र झटक्याचा देखील परिणाम होऊ शकतो. तसेच अर्धांग वायूचा देखील धोका निर्माण होऊ शकतो. आणि शरीरातील काही अवयव निकामी देखील होऊ शकतात असा धोका तज्ञांनी वर्तवला आहे. आपली मुले अशा इंजेक्शनच्या सेवनात तर नाहीत ना याची काळजी पालकांनी देखील घेण्याची गरज











