• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाईतील ऐतिहासिक मेणवलीत सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांनी केली ५ लाखाची लूट!

tdadmin by tdadmin
December 28, 2024
in सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, व्यक्ती विशेष, Featured
0
परभणी घटनेच्या निषेधार्थ उद्या संविधान प्रेमींची दौंड बंदची हाक!

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : मेणवली (ता. वाई) येथे आज पहाटे १२. ४५ च्या सुमारास दहा ते बारा जणांनी भूषण शरद कोचळे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून घरातील ४ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचादीचे दागिने लुटले. याबाबत वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यानी आणखीही काही घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मेणवली येथे शरद कोचळे व संतोष शरद कोचळे हे भाऊ एकत्र कुटुंबात राहतात. २७ डिसेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर ते आपापल्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले. आज पहाटे १२. ४५ च्या सुमारास संतोष कोचळे यांना घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरदार लाथ मारत असल्याचे जाणवले.

ते हॉल मध्ये गेले असता दरवाजा बाहेरून तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दरवाजा दाबून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांची पत्नी शीतल यांना व संतोष यांना धारदार सुऱ्याचा धाक दाखवत अंगावरील तसेच कपाटातील दागिने जबरदस्ती काढून घेतले.

यावेळी सात ते आठ चोरटे तोंडाला व डोक्याला रुमाल बांधून घरात शिरलेले होते. तर पाच ते सहा चोरटे घराबाहेर लक्ष ठेवून होते. दरम्यान भूषण यांना जाग आली. ते हॉलमध्ये गेले असता तीन-चार चोरट्यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवत ओरडू नका असा दम दिला. मात्र भूषण यांनी तिथून पळून जात घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर पडले. गावात जाऊन त्यांनी इतर लोकांना सावध करत झालेली घटना सांगितली.

गावातील दहा पंधरा लोक मिळून काही वेळातच घराकडे आले, मात्र तोपर्यंत घरातील सर्वसामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसून आले. तसेच घरातील सोन्या चांदीचे सुमारे ४ लाख ५६ हजार रुपयांचे मौल्यवान दागिने चोरले होते. यावेळी ग्रामस्थांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेला संदेश पोहोचवला. थोड्याच वेळामध्ये भोंगा वाजून ग्रामस्थांना सावधतेचा इशारा दिला. 

काही तरुणांनी दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आल्याचे समजते. सदर घटनेची माहिती वाई पोलिसांना समजताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच तज्ञांचे पथक रात्रीच बोलावण्यात आले होते. या घटनेमुळे मेणवली व पंचक्रोशीतील गावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.

Next Post
धनुर्विद्येमध्ये राज्यात वाईचे नाव ‘सार्थक’ झालं! वाईच्या सार्थकची सुवर्ण कामगिरी! 

धनुर्विद्येमध्ये राज्यात वाईचे नाव 'सार्थक' झालं! वाईच्या सार्थकची सुवर्ण कामगिरी! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group