मुनिर तांबोळी बारामती (९८९०३६२९८६)
मुंबईतील गेटऑफ इंडिया वरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला एका सुसाट स्पीड बोटने धडक दिली. यामध्ये लहान मुलांसह अनेकांचे जीव धोक्यात आले. नौदलाच्या तीन लोकांसह तेरा लोकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला..
यावेळी घटनास्थळाजवळच आपली बोट घेऊन समुद्रात आरिफ मोहम्मद होते. त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता प्रसंगावधानतेची तत्परता बाळगत आपल्या बोटीतून बुडत असलेल्या प्रवाशांची मदत करत अनेकांचे प्राण वाचवले. एका तीन वर्षाच्या लहानग्या मुलीच्या नाकात तोंडात पाणी गेले असता प्रसंगावधान ओळखून आरिफभाई त्या मुलीच्या पोटातील पाणी काढून तिलासुद्धा जीवदान दिले.
जेव्हा खोल समुद्रात बोट पलटी झाली होती त्यावेळेस साक्षात मृत्यू थैमान घालत असताना मोहम्मद आरिफ साक्षात देवदूताच्या रूपात येऊन मदत केली व अनेकांचे प्राण वाचवले. मोहम्मद आरीफ मानवता धर्माचे पालन करत होते, म्हणून मानवता खतरे में येऊ देऊ नका! सुज्ञ जनतेने, माणसांनी समाजात कुठल्याही प्रकारचा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना व राजकीय नेत्यांना खाड्यासारखं बाजूला केले पाहिजे…
बटेगें-कटेगें ऐवजी, हक्कदार के हक बाटेंगे, हा नारा दिला पाहिजे..शिक्षा बाटेंगे… रोजगार बाटेंगे.. सुरक्षा बाटेंगे… महीला सुरक्षा बाटेंगे! किसानों के अधिकार बाटेंगे.. समानता बाटेंगे… न्याय बाटेंगे… गरीबो के हक्क और अधिकार बाटेगे… सभी को स्नेह और प्यार बाटेंगे..
अश्याच घोषणा देण्याची हिंमत कोण्या राजकारण्यात आजच्या घडीला शिल्लक आहे का…?? असेल तर हि घोषणा देऊन बघा व यावर अंमल बजावणी करून बघाच… ज्या दिवशी आपला भारत देश ,जात, धर्म, लिंगभेद, विसरून जेव्हा मी प्रथम भारतीय नागरिक म्हणून एकसंघ,एकजूट होईल त्या दिवशी आपल्याला जगाच्या पाठीवर महासत्ता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही…
त्यादिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही नांदेल आणि भारतीय लोकशाही जगाच्या पाठीवर सर्वोत्तम लोकशाही म्हणून गणली आणि मानली जाईल आणि
संविधांची मुल्य, समता, बंधुता, न्याय, लागू होतील…
त्यादिवशी खऱ्या अर्थाने आपण महासत्ता होऊ आणि आपण व आपल्या पुढील पिढ्या सुजलाम सुफलाम् होतील..!











