• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उजनी धरणग्रस्त, पुनर्वसितांचे प्रश्न सोडवण्यासाठी उजनी धरण विकास प्राधिकरणाची स्थापना हवी…

tdadmin by tdadmin
December 20, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
उजनी धरणग्रस्त, पुनर्वसितांचे प्रश्न सोडवण्यासाठी उजनी धरण विकास प्राधिकरणाची स्थापना हवी…

डॉ. संदेश शहा.

उजनी धरण पूर्ण होवून आता ४५ वर्ष झाले आहेत, मात्र धरणासाठी त्याग केलेल्या काही भूमिपुत्रांचे अद्याप सर्व प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे उजनी धरणग्रस्त तसेच पूनर्वसित गावांचे प्राधान्याने प्रश्न सोडविण्यासाठी उजनी धरण लाभ विकास प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी धरणग्रस्त नागरिकांची केली आहे.

उजनी धरण अर्थात यशवंतसागर जलाशयात सन १९७९-८० साली पाणी साठविण्यासाठी सुरुवात झाली. उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्यातील ३२ गावे व वाड्यावस्त्यांनी त्याग केला. तसेच करमाळा तालुक्यातील काही गावांनी उजनी धरणासाठी त्याग केला. काही शेतकऱ्यांच्या भीमा नदीकाठच्या जमिनी कवडीमोल किमतीने संपादन करण्यात आल्या. धरण पूर्ण होवून पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना वरदान ठरले.

त्यामुळे शेतकरी, शेती पूरक व्यवसाय, सहकारी व खाजगी साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसाय वाढला. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. मात्र धरणासाठी त्याग केलेल्या अनेकांच्या अडचणी संपल्या नाहीत. काहींचे अद्याप व्यवस्थित पुनर्वसन झाले नाही. काही लोकांना नोकरीत घेऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र आता सरकारी नोकरीचे वय संपत आले, तरी त्यांना नोकऱ्या नाहीत. उजनी धरण पुनर्वसित गावामध्ये रस्ते, स्मशानभूमीसह शासनाने १४ आश्वासने दिली होती. मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली किंवा नाही हे पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे.

शासनाने जमीन संपादित केल्या, त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धत होती, मात्र आता कुटुंबे वेगवेगळी झाल्याने फायदा मात्र एकाला तर घरातील दुसरी माणसे मात्र विस्थापित झाली. धरणग्रस्त दाखल्याचा फायदा कारभाऱ्याच्या मुलाला, मात्र इतरांची मुले मात्र वाऱ्यावर अशी परिस्थिती झाली. त्यामुळे काही धरणग्रस्त तुपाशी तर काही भूमिपुत्र मात्र उपाशी अशी परिस्थिती झाली आहे. काही लोकांना पंढरपूर तालुक्यात पर्यायी जमिनी मिळाल्या, मात्र सदर जमिनी ताब्यात घेताना एकाचा खून करण्यात आला. त्यामुळे लोकां मध्ये दहशत निर्माण झाली. त्यामुळे अनेकांनी मिळालेल्या पर्यायी जमिनी मिळेल, त्या किंमतीत वहिवाटदारांना विकल्या. पूर्वी काही बागायतदार शेतकरी घोड्यावरून फिरत होते मात्र आता त्यांच्या वारसांना बिकट परिस्थितीस सामोरे जावे लागले आहे.

उजनी धरणातील पाण्यावर सुमारे ३० सहकारी व खाजगी साखर कारखाने आहेत. एका कारखान्याची किमान २०० कोटी रुपयांची उलाढाल पकडल्यास वर्षाला सहा हजार कोटी हून जास्त उलाढाल होते. १३ पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतून देखील कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. शेती पूरक व्यवसाय यामधून देखील कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मात्र ज्या भूमिपुत्रांनी उजनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्या साठी शासनाने देखील युद्ध पातळी वरून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आजमितीस ८०० हून जास्त उजनी भूमिपुत्रांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. माजी खासदार शंकरराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गणपतराव आवटे, त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, अरविंद जगताप, अंकुश पाडुळे आदींनी हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. हर्षवर्धन पाटील अखेरच्या टप्प्यात मंत्री असताना इंदापूर तालुक्यात बिजवडी येथे पुणे व सोलापूर जिल्हा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी व बाधित शेतकरी यांचा शेवटचा मेळावा झाला होता. 

आता दत्तात्रय भरणे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यांच्यासाठी ही एक प्रकारची संधी देखील आहे. उजनी धरणासाठी त्याग केलेल्या, मात्र ज्यांचे व्यवस्थित पुनर्वसन झाले नाही त्यांची एकदाची वर्गवारी करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्यांनी धरणासाठी त्याग केला, त्यांचे बारमाही पाणी आठमाही करण्यात आले, हा धरणग्रस्तांवर अन्याय आहे. धरणाचे पाणी उन्हाळ्यात शेतीला पुरत नाही त्यामुळे उत्पादना वर देखील परिणाम होतो. धरणातील पाण्याचे देखील वाटप व्यवस्थित व्हायला पाहिजे. सोलापूर शहरास वाढती लोकसंख्या लक्षात घेता १० टीएमसी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे मात्र २५ टीएमसी पाणी सोडले जाते. पावसाळ्यात ५० टीएमसी हून जास्त पाणी खाली कर्नाटक ला वाहून जाते. त्याऐवजी पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील पाण्याची गरज लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचे दरवर्षी जल लेखा परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी उजनी धरण लाभ विकास प्राधिकरणाची स्थापना होणे ही काळाची गरज आहे.

Next Post
परभणी घटनेच्या निषेधार्थ उद्या संविधान प्रेमींची दौंड बंदची हाक!

कल्याणच्या अजमेरा हाईट्स मध्ये मराठी माणसांची घोषणाबाजी... कालच देशमुख बंधूंना शुक्ला यांच्याकडून झाली होती मारहाण..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group