काका यादव, भवानीनगर
राज्य सरकारच्या ऊर्जा उद्योग व कामगार विभागाने महाराष्ट्रातील साखर कारखाना साखर कारखान्यातील कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात व इतर मागण्यांसाठी त्रिपक्षीय समिती स्थापन केली आहे. पहिल्या समितीची मुदत आठ महिन्यापूर्वी संपली होती, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घातले व ही समिती नव्याने स्थापन करण्यात आली. त्यानुसार समितीचे सदस्य देखील नव्याने निवडण्यात आले आहेत.
या समितीमध्ये इंदापूरच्या शुगर वर्कर्स युनियनचे अध्यक्ष युवराज तुकाराम रणवरे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, दिलीपराव देशमुख, प्रकाश कवाडे आवाडे राजेश टोपे, बी. बी. ठोंबरे, पांडुरंग राऊत, योगेश पाटील, समय बनसोड, अविनाश जाधव हे साखर कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून या समितीच्या सदस्य पदी निवडले आहेत.
तर कामगारांच्या वतीने तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, अविनाश आदिक, शंकरराव भोसले, युवराज रणवरे, अविनाश आपटे, राजेंद्र तावरे, राव पाटील, आनंदराव वायकर, पी. के. मुडे, सत्यवान शिखरे, शिवाजी औटी, दत्तात्रय निमसे आदींची निवड करण्यात आली आहे. तर शासनाचे प्रतिनिधी म्हणून साखर आयुक्त खेमनार, कामगार आयुक्त व सदस्य सचिव म्हणून कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची निवड करण्यात आली आहे. तर या समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून वकील भूषण महाडिक यांची निवड करण्यात आली आहे.
गेली 40 वर्ष युवराज रणवरे हे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे नेते म्हणून साखर कामगारांच्या चळवळीत काम करत आहेत. अनेक प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले असून ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध आहे. साखर कामगारांच्या प्रश्नावर अभ्यासू पणे मते मांडून कारखाना आणि कामगार या दोघांमध्ये समन्वयाची भूमिका ते सातत्याने घेत असतात. त्यांची निवड झाल्याने इंदापूर तालुक्यातील साखर कामगारांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.











