दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : महाराष्ट्र तसेच इतर राज्यात चोरीस गेलेले व गहाळ झालेले १२ लाख रुपये किंमतीचे एकूण ६० मोबाईल वाई पोलिसांनी शोधून तक्रारदारांना परत केले.
वाई पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मोबाईल तक्रारींबाबत गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगांवकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस योग्य ते मार्गदर्शन करुन सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्त्काळ छडा लावण्याबाबत आदेश केले होते.
या तात्काळ कारवाईकरीता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातून गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण ६० मोबाईल परत मिळवून तक्रारदारांना उपअधिक्षक प्रभारी अधिकारी वाई यांच्या हस्ते परत केले. गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले व पोलीस प्रशासनाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली श्याम पानेगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे प्रमुख फौजदार सुधीर वाळुंज, हवालदार अजित जाधव, विशाल शिंदे, राम कोळी, हेमंत शिंदे, मंगेश जाधव, ज्ञानेश्वरी भोसले महेश पवार (सायबर) यांच्या पथकाने केली.











