ज्ञानेश्वर पोमणे, माजी सरपंच, बाबुर्डी-बारामती
वेळ चांगली असो की वाईट, अजितदादा आपल्या माणसांना कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. परवा शपथविधी झाला आणि काल दादांनी पक्षातील विधानसभेच्या निवडणुकीतील पराभूत झालेल्या आपल्या उमेदवारांची ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक घेतली.
पक्ष कुठं कमी पडला, उमेदवार कुठं कमी पडले यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि मग या आपल्या शिलेदारांना पाठीवर कौतुकाची थाप देऊन पुढच्या निवडणुकीत त्यांना १००% विजयी करून विधानसभेत आणणार असे वचन दिले. पराभवाने खचून न जाता त्यांना नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागायला सांगितले.
पराभूत झाले असले, तरी मतदारसंघातील कामे घेऊन या, मी ती कामे करून देतो असा शब्दही त्यांना दिला. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी प्रवृत्ती आपल्याला राजकारणातच नव्हे, तर सर्वत्रच दिसत असताना अजितदादा यांचा हा ‘रिफ्रेशिंग अप्रोच’ अनुकरणीय आहे, फक्त राजकारणी लोकांना नव्हे तर सर्वांनाच.











