राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या सभांना दौंडच्या पूर्व भागातील दौऱ्याला नागरिकांचा आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. रमेश थोरात यांचे भाषण ऐकण्यासाठी सभेला लक्षवेधी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून आले.
दौंड विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदारसंघातील गावागावांमध्ये गाव बैठका आणि प्रचार दौऱ्यांवर भर दिला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी रविवारी दौंड च्या पूर्व भागातील देऊळगाव राजे, वडगाव दरेकर, पेडगाव, शिरापूर आदी गावांमध्ये सभा पार पडली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
सभेपूर्वी मोठ्या संख्येने मतदार थोरात यांची तासंतास वाट पाहत होते. ठिकठिकाणी ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रमेश थोरात यांनी नागरीक आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिरापूर येथील झालेल्या सभेत रमेश थोरात म्हणाले की, मी आमदार असताना दौंड शहर भव्य दिव्य प्रशासकीय इमारत उभी केली. कितीतरी वर्षाचा कुरकुंभ मोरीचा प्रश्न मार्गी लावला.
शहरात 25 कोटीचा निधी उपलब्ध करून सुसज्ज असे भुमिगत गटारी काढून सांडपाण्याची विल्हेवाट लावून शहर स्वच्छ केले. दौंडच्या पूर्व भागातील वाड्यावस्तांवर 27 ते 28 स्वतंत्र रोहीत्रे बसवल्याने या भागातील विजेची समस्या सोडवली. संजय गांधी योजनेच्या ९ हजार विधवा महिलांना पाच वर्षात लाभ मिळवून दिला. माझ्या पाच वर्षाच्या कालावधीतच गावागावातील प्रलंबित कामे मार्गी लावली. असे एखादं ठोस काम केल्याचे विरोधकांनी दाखवावे असे आवाहन थोरात यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी आप्पासाहेब पवार,बाळासाहेब कापरे, दिग्विजय जेधे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नेते राजन खटी, अनिल सोनवणे, सुभाष नागवे, वंदना मोहिते, प्रशांत शितोळे, विठ्ठल खराडे, उत्तम आटोळे, माऊली कापसे, संपत कापसे, हरीश ओझा, अमित गिरमकर, पोपटराव ताकवणे, अमोल सातव आदींसह पूर्व भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











