विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला.तर शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जेष्ठ नेंते शरद पवार ,बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.
अजित पवार यांचे शक्तिप्रदर्शन चालू असताना अजित पवार गटाचे कार्यकर्ते तहसील कार्यालय येथे जमा होण्यास सुरूवात झाली होती. त्याच वेळी अगोदर शरद पवार यांचा ताफा युगेंद्र पवार यांचा फॉर्म भरून बाहेर निघाला.त्यानंतर युगेंद्र पवार यांचा ताफा बाहेर पडल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या व शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच दादा युगेंद्र दादा अशा घोषणा दिल्या.
त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा बाहेर पडल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जात शांतपणे नमस्कार केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांचा ताफा पुढे रवाना झाला.











