• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑनलाईन फसवणूक टाळायचीय? हे नक्की वाचा…

Maha News Live by Maha News Live
February 9, 2020
in क्राईम डायरी, राजकीय, राज्य
0
ऑनलाईन फसवणूक टाळायचीय? हे नक्की वाचा…

दररोज आपण ऑनलाईन फसवणूक झाली, ओटीपीवरून बॅंकेतून पैसे काढले गेले अशा बातम्या वाचतो, ऐकतो. डिजीटल कडे वाटचाल करताना या गोष्टी आता सर्रास होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. आपली फसवणूक टाळण्यासाठी काय करावे हे सांगणारा पुणे महानगर अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष विजय सागर यांचा महत्वपूर्ण लेख…

आपल्या हातातील स्मार्ट मोबाईल आपली चालती बोलती बँक आहे. बँकांचे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून ते सर्रास वापरतो. सध्या paytm, गूगल pay, upi अशी अनेक पेमेंट अॅप वापरली जात आहेत. काळाबरोबर राहणेसाठी ते गरजेचे आहे, मात्र असे अॅप वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे. त्याची संपूर्ण माहिती करून घेतली पाहिजे. ऑनलाईन खरेदी करताना समोरून काही पैसे देणेसाठी सांगितल्यानंतर काही माहिती भरताना आपण काळजी घ्यावी. सर्वात अगोदर ज्या संकेतस्थळावरून आपण खरेदी करतो, ती सुरक्षित आहे का ते तपासावे. त्यासाठी एक कुलूप असलेली खूण येते का, तसेच Https अशी सुरुवात आहे का, हे ही तपासावे. आपणास जी लिंक दिलेली आहे तिच्यावर क्लिक करू नका तर आपण त्या लिंक मध्ये जे लिहिले आहे ते टाईप करावे आणि त्या साईट वर जावे, कारण कधी कधी फसवणूक करणारे आपल्याला जी लिंक देतात ती भलतीच असते. आपणास इतर ठिकाणी घेऊन जाते व आपला सर्व डेटा, बँक मधील पैसे हे काढून घेऊ शकतात. त्यासाठी आपण वरील अॅड्रेस बार मध्ये टाईप करून सदर साईट वर जा. गूगलवरही संकेतस्थळ निघाले तरीही धोका असतो, कारण गुगल वरूनही फ्रॉड करणारे लोक सध्या सक्रीय आहेत. त्यामुळे कोणत्याही लिंकने जर बँक अकाऊट नंबर, पिन, क्रेडिट कार्ड, पिन नंबर असे काही मागितले तर लगेच त्या संकेतस्थळावरून बाहेर पडावे. कारण स्वस्ताईच्या नादात आपणास आपले सर्व पैसे गमवावे लागू शकतात.

आपल्या मोबाईल मेसेज मध्ये व्हॉटसअप, फेसबुक तसेच मेसेंजरद्वारे काही लिंक येतात, सदर लिंकवर क्लिक केले की आपणास काही अटी व शर्ती या मान्य आहे असे टिक करून मगच पुढे जाऊ दिले जाते, आपण घाईत असतो आणि आपण सदर अटींवर काहीही न वाचता क्लिक करतो, मात्र ते चुकीचे आहे, कारण आपण त्याद्वारे अशा अटी व शर्तींना एकप्रकारे मान्यता देत असतो. ज्यातून भविष्यात आपले फार मोठे नुकसान होऊ शकते, शिवाय आपली सारीच माहिती आपण त्या संकेतस्थळाला आयती देतो. आपण भविष्यात कसे दिसणार, आपली सर्वात लाडकी मैत्रीण कोण, आपल्यावर कोण जास्त प्रेम करते, आपण कोणत्या नटाप्रमाणे दिसतो, आपला स्वभाव कसा आहे हे सांगणारी साईटस हा एक सापळा देखील असतो. कारण त्यातून आपली सर्व माहिती, अकाउंट इन्फॉर्मेशन आपण त्यांना देऊन टाकतो. एक लक्षात घ्या, या जगात कोणीही काहीही फुकट देत नाही, अगदी राजकारणी देखील जे फुकट देतो म्हणतात ते देखील फुकट देत नसतात.

तेव्हा लक्षात ठेवा, आपणच सायबर गुन्हा न होण्यासाठी स्वतः काळजी घ्यावी.
ऑनलाईन ओएलएक्ससारखे घोटाळ्यांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. कोणीही आपली वस्तू बाजारभावापेक्षा जेव्हा अत्यंत कमी किमतीत विकायला काढतो, तेव्हा ती जाहीरात काहीतरी घोटाळ्याची आहे लक्षात घेतले पाहिजे. अशावेळी आपणास एखादा क्यूआर कोड पाठवला जातो आणि आपण तो स्कॅन करून घेतो, मात्र तो पैसे घेण्याऐवजी देणेचा असू शकतो. तसेच आपला आलेला ओटीपी हा जर आपण पुढील व्यक्तीला सांगितला, तर आपणास आपल्या बॅंकेतून किती पैसे काढले जात आहेत हेही कळत नाही. तेव्हा बँक, क्रेडिट कार्ड चा आलेला otp कधीही कुणाला सांगू नका, कारण आपला मोबाईल हा बँकेस जोडलेला असतो.
एका व्यक्तीने OLX वर एक वस्तू विकायला ठेवली, त्याला समोरून एकाने सांगितले की मला ती वस्तू पाहिजे आपले अकाउंट डिटेल द्या, मी त्यात पैसे भरतो. त्यानंतर त्याला परत फोन आला की आपण आपला मोबाईल चेक करा आणि otp आला असेल तो सांगा. विक्री करणाऱ्या व्यक्तीने otp नंबर सांगितला आणि त्याच्या बॅंकेतून बरीच मोठी रक्कम काढली गेली. त्यामुळे आपणास आलेला otp कधी कुणाला सांगू नका.

आपला गेम होतो, लक्षात येत नाही..

आपला मोबाईल आपण वापरत असताना वेगवेगळ्या गेम्स खेळतो, त्या सर्व मोफत असतात, पण काही गेम्स या चालू असताना आपल्याला कळतही नाही की, बॅकग्राउंडला आपली सर्व माहिती ही त्यांच्या server वर चालली आहे, ज्यात आपले फोटो, बँक डिटेल, मोबाईल नंबर, फॅमिली ची माहिती असे बरेच काही असते. गेम चालू असताना आपणास मेसेज येतो की आपण पुढच्या लेव्हल वर जात आहात आपणास कंपनी कडून बक्षीस लागले आहे आणि पुढच्या लेव्हलचा कोड आपल्याला मेसेज द्वारे पाठवला आहे, पण सदर कोड हा आपला otp असू शकतो. तेव्हा ग्राहकांनी, मोबाईल वापरकर्त्यानी सावध राहिले पाहिजे. आपल्या मुलांना पण गेम खेळत असताना आणि घरात आई बाबा झोपलेले असताना मेसेज येतो किंवा फोन करून आईबाबा च्या पाकिटातून कार्ड काढ, त्यात असलेले कार्ड वरील नंबर गेम मध्ये टाक, तुला बक्षीस लागले आहे ते मिळेल असे सांगितले जाते. वास्तवात आपली बँक रिकामी केली जाते. तेव्हा मुलाला पण मोबाईल देताना तो बँकेला कनेक्ट नसेल तरच द्या. बँक आपणास नेहमी मेसेज पाठवते की बँकेतील कोणीही व्यक्ती अथवा बँक आपले अकाउंट नंबर, कार्ड नंबर, CVV number मागत नाही. पण आपण असे मेसेज आले तरी फक्त ते delete करतो.
तेव्हा माझ्या प्रिय ग्राहक मित्रानो, आपण आपल्याचद्वारे आपलीच माहिती अशा फसवणूक करणाऱ्या लोकांना उघडी करून देऊ नका, तर ती व्यवस्थित बंद ठेवा. मेसेज मध्ये किंवा ईमेल मध्ये आपली बँक माहिती, आधार कार्ड माहिती, pan number आणि पासवर्ड ठेऊ नका. फसवणूकीचे अनेक फंडे आपण रोज पेपर मध्ये वाचतो, त्यातून बोध घ्या आणि काळजी घ्या. सतर्क रहा. ऑनलाईन कामे करावीच लागतील त्या पासून सुटका नाही पण ती करत असताना काळजी घ्या, कारण पैसे कमवायला तसेच फॅमिली साठी विश्वास कमवायला वेळ लागतो. आपण आपले स्टेटस फेसबुक किंवा व्हाटसपवर टाकताना चोरांना आयती संधी तर देत नाही ना हे पहा कारण आपले स्टेटस कोणीही पाहू शकते आणि त्या माहिती चे आधारे आपल्या घरातून चोरू करू शकतात. तेव्हा स्टेटस टाकण्याच्या नादात आपण आपल्या घराची किल्ली चोरांच्या ताब्यात तर नाही देत हे पाहा.

Tags: Credit CardGamesOnline Fraud
Next Post
बारामतीचं झालंय जंगल….

बारामतीचं झालंय जंगल....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group