अहिल्यानगर : महान्यूज लाईव्ह
आमदार रोहित पवारांच्या विचारसरणीवर प्रभावित होऊन कर्जत तालुक्यातील शिंपोरा, मानेवाडी येथील कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. रोहित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
बाबासाहेब काळे, सतीश काळे, अमोल काळे, गोकुळ (विठ्ठल) कानगुडे, पोपटराव काळे या युवा कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार प्रवेश केला. रोहित पवार या्ंच्यामुळे शिंपोरा भागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागल्याने आम्ही भाजप सोडून रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे यावेळी या कार्यकर्त्यांनी सांगितले.
खेड-शिंपोरा-मानेवाडी या मंजूर असलेल्या परंतु अर्धवट असलेल्या कामाला रोहित पवारांमुळे पुन्हा गती मिळाली असे त्यांनी सांगितले. या पक्ष प्रवेशावेळी रामचंद्र भोसले, शिवाजी भोसले, हेमंत काळे, विठ्ठल माने, प्रशांत गायकवाड, महेंद्र काळे, अमोल चव्हाण, राहुल भोसले, ह.भ.प. शरद महाराज काळे, अभिजीत काळे, शहाजी माने, पद्माकर काळे, अण्णासाहेब काळे, शरद खराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











