विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : बिग बॉस मराठी ५’ चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात रीलस्टार सुरज चव्हाण याने ‘बिग बॉस मराठी ५’ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. बारामतीचा सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. सूरजने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तो सर्वाधिक मतं मिळवून या पर्वाचा विजेता ठरला. अत्यंत गरीब परिस्थितीतून वर येत सूरजने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं.
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटसअप, ट्विटरवर आणि सोशल मीडियावर सर्वत्र सूरज चव्हाणचीच हवा आहे. हे सूरज चव्हाणने दाखवून दिलं आहे. सूरज चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. आता बारामतीकर सुरजचं कसं स्वागत करणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.











