आग्रा : महान्यूज लाईव्ह
शाळकरी विद्यार्थ्यांची गुन्हेगारी एवढी वाढत चालली आहे की, त्याला कोणतेही राज्य आता मर्यादित राहिलेले नाही. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे तर शाळेतील विद्यार्थिनीवर नाही तर शाळेतील आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षिकेलाच चार विद्यार्थ्यांनी मिळून ब्लॅकमेल केले आणि सर्वांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले.
या शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ बनवून एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर तो प्रसारित देखील केला. त्यामुळे या शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना कळल्यानंतर पोलिसांनी शक्ती अभियान केंद्रामार्फत तक्रार दाखल करत सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडिओ पाठवले आणि चारही विद्यार्थ्यांना अटक केली.
हा प्रकार मथुरेतील आहे. मथुरेत एका शाळेत शिक्षिका असलेल्या या शिक्षिकेशी दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विषयातील अभ्यासाच्या निमित्ताने जवळीक साधली व तिच्याशी चॅटिंग केले. काही दिवसानंतर विद्यार्थ्यांनी चोरून शिक्षिकेचा व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढला आणि ते एडिट करून तिला दाखवले आणि शिक्षिकेला शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी दिली.
त्यातील एका विद्यार्थ्याने तेवढ्यावर न थांबता इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट केला. या घटनेमुळे नैराश्यात गेलेल्या शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. शाळेत घडलेल्या या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली. पोलिसांनी यामध्ये तातडीने दखल घेत चारही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. न्यायालयाने या विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.











