पुणे : महान्यूज लाईव्ह
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या घटनेत गॅंगरेप झाल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी बोपदेव घाटात मित्रासोबत गुरुवारी रात्री ही तरुणी फिरायला गेली होती. त्यावेळी तीन अनोळख्या व्यक्ती तिथे आल्या आणि त्यांनी तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला.
पीडित मुलगी ही मूळची सुरत येथील राहणारे असून जळगाव मधील तिचा मित्र आणि ते दोघेही पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. गुरुवारी रात्री दोघे दुचाकीवरून बोपदेव घाटात फिरण्यास गेले. त्यावेळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी अडवले आणि तरुणाला मारहाण करत शर्ट आणि बेल्ट ने बांधून ठेवले तरुणीला मारहाण केली आणि तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.
रात्रीच्या अकरा वाजलेले आणि स्थळ निर्जन असल्याने या पिडीत तरुणीला कोणतीही मदत मिळू शकली नाही. रात्री बारा दरम्यान तीन जण या भागात फिरत असताना त्यांना हे दोघेजण दिसले आणि त्यांनी हा गॅंगरेप केला. या घटनेनंतर दोघे घाबरले होते, मात्र तिच्या मित्राने तिला एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आणि तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.











