मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्य सरकारने प्रचंड भला मोठा खर्च करून महावाचन उत्सव शाळांमध्ये सुरू केला. नुकताच आता हा महावाचन उत्सव संपला. त्यासाठीची प्रमाणपत्र वितरित केली जात आहेत. काही ठिकाणचे प्रमाणपत्रे शुद्ध मराठीत आहेत, परंतु ठाण्यातील एक सोशल मीडियावर व्हयरल होत असलेले महावाचन उत्सवाचे प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकारच्या गमती जमती उघड करत आहे. महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रावरचा मजकूर असा आहे..
सरस्वती माध्यमिक विद्यालय, ठाणे, इयत्ता 10 वी, महावचन उत्सव 2024 या महावचन इयत्ता 9 वी ते 12 वी या गतातून सहभाग घेतलयाबादल अपनास हे संरक्षण पत्र प्रदान केले जात आहे। आपका वाचनच्या आवेदन और सक्रिय सहभागी हा निगम यशस्वी झाला है। वाचनाचा यात्रा आपल्याला नव्या उंचीवर नून ठेवेल यात सादि नहीं। महावचन उत्सव सहभागी नापका अभिनंदन। आपलिया पुढिल वाचन यात्रासाची हार्दिक शुभेच्छा!

या पत्राची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सगळीकडे या गमतीजमतीची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर नेटकरी म्हणाले, हे प्रशस्तिपत्र वाचा आणि हे कोणत्या भाषेत आहे ते ओळखा! खरं तर मराठी ही भाषा देवनागरी लिपीत आहे व त्याची वर्णाक्षरे आहेत. बहुतेक संगणकावर मराठी टायपींग करिता कृती देव हा विनामूल्य फाॅन्ट उपलब्ध असतोच. पण त्यासाठी की बोर्ड वर मराठी टायपींग यावी लागते.
हल्ली गुगल टायपींग मध्ये इंग्रजी वर्णाक्षरे टाईप करुन मराठी अक्षरे/शब्द टाईप केली जातात. पण त्यामुळे मुळ मराठी शब्दांचे स्वरुप बदलते व असे मजेशीर किस्से तयार होतात! विशेष म्हणजे हे प्रशस्तीपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने छापलेले आहे आणि त्यावर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्या सह्या आहेत. प्रशस्तिपत्र लिहिण्यापुर्वी संबंधितांनी ती वाचून तपासून बघण्याची मुळीच तसदी घेतलेली दिसत नाही.
हल्ली शासकीय कामकाजात बेजबाबदारपणा कमालीचा वाढलेला आहे आणि याचे हे उत्तम उदाहरण आहे. दस्तुरखुद्द शासकीय दस्तावेजात मायबोली मराठीची ऐशीतैशी! गुगल टायपींग मुळे अनेकांच्या नावात, आडनावात, गावांच्या नावात बदल होऊ लागले आहे. अतिशय चिंताजनक बाब आहे. हा प्रकार केवळ हसण्यावारी घेऊन चालणार नाही, तर ही बाब गंभीर समजून यावर शासकीय स्तरावर कठोर उपाययोजना व्हायला हवी!
आता हे दुसरे एक पत्र पहा

महावाचन उत्सव गेल्या वर्षीपासून राज्यात राबवला जात आहे. यावर्षी देखील 16 जुलै 2024 रोजी सरकारने महावाचन उत्सव यावर्षी देखील राबवण्याचे जाहीर केले. त्यानुसार 5 डिसेंबर 2023 रोजी याची सुरुवात झाली राज्यातील 66 हजार शाळा व 52 लाख विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. रीड इंडिया सेलिब्रेशन या संस्थेने कोणताही मोबदला न घेता या उपक्रमात पुढाकार घेतला. दस्तूर खुद्द अमिताभ बच्चन यांना या उपक्रमासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमण्यात आले होते. महावाचन उत्सवासह निपुण उत्सव महावाचन उत्सव व शाळा मधील इतर ऍक्टिव्हिटी या संबंधित योजनांसाठी राज्य सरकारने 8.75 कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र त्याची प्रमाणपत्र पाहिल्यानंतर सरकारी उदासीनता कशी असते हे दिसून आले.











