पुणे : महान्यूज लाईव्ह
घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरातील. मध्यरात्रीच्या सुमारास घरावर दरोडा पडला. घरात शिरलेल्या चोरट्यांनी थेट चाकूने वार करत घरमालकाला जीवे मारले. अर्थात घरातील दागिने, रोख रकमा, ऐवज लंपास केलाच.. त्यामुळे हा दरोडा होता असं सांगितलं गेलं, पण पोलिसांची नजर बेरकी! त्यांनी अगदी नजरेने हेरलं की, काहीतरी भानगड आहे आणि खरोखरच ती भानगडच निघाली.. अनैतिक संबंधातून बायकोनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा जीव घेतल्याचे समोर आले. त्यासाठी फक्त दरोड्याचा बनाव केला गेला.
अनैतिक संबंधातून कर्वेनगर येथील एका सोसायटीत राहणाऱ्या 42 वर्षीय अमोल या व्यक्तीचा खून झाला. अमोल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. मध्यरात्री अचानक कोणीतरी त्यांचा दरवाजा वाजवला. दरवाजा उघडताच चोरटे घरात शिरले. त्यांनी थेट अमोल यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. त्यानंतर घरातील दागिने, रोकड आणि किमती वस्तू चोरून नेल्या. दुसऱ्या दिवशी पोलिसांना हे सांगितल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी भेट दिली.
अमोल यांच्या पत्नीने दरोड्याची माहिती दिली, मात्र काही गोष्टी पोलिसांना खटकल्या त्यांनी चौकशी केली आणि त्यांची संशयाची सुई अमोल याच्या पत्नीवर वळाली. पत्नीची चौकशी केल्यानंतर असंबद्ध गोष्टींची माहिती मिळू लागल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली आणि अखेर त्याच्या पत्नीस ताब्यात घेतले. तेव्हा बॉयफ्रेंडच्या मदतीने तिनेच पत्नीचा खून केल्याचे समोर आले.











