• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एन.पी.इन्फ्रा या कंपनीवर कारवाईसाठी आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण..!

tdadmin by tdadmin
September 20, 2024
in आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, Featured
0
एन.पी.इन्फ्रा या कंपनीवर कारवाईसाठी आजपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण..!

राजकीय वरदहस्त व संबंधित अधिकारी खिशात ठेवणा-या कंपनीवर खरंच कारवाई होईल..?

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शेटफळ हवेली येथील पाझर तलावातील मुरुमाचे उत्खननासाठी एनपी इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा.लि. कंपनीने परवानगी घेतली खरी.. पण काही नेत्यांच्या सहकार्याने शासकीय अटी बासनात गुंडाळून परवानगीपेक्षा कितीतरी पटीने मुरुम दिवस रात्र उचलून एक प्रकारे मुरुमावर दरोडा टाकला.

बेकायदेशीर मुरूम उचलणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी करूनही महसूल खाते कंपनीवर फिदा झाले व कारवाई न करता दात काढून गप्प बसले…अखेर गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांनीच कारवाईसाठी उपोषणाचे हत्यार उपसले.. कारवाई झाल्याशिवाय माघार नाही असे म्हणत इंदापूर तहसील कार्यालयासमोर २० सप्टेंबर पासून उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

इंदापूर तालुक्यात राजकीय नेत्याच्या राजाश्रयाच्या आशीर्वादाने तसेच पैशाच्या व महसूलच्या प्रशासनाच्या सहकार्याने निर्धास्तपणे परवानगी पेक्षा लाखो रुपयांचा अधिकचा अधिकचा मुरूम दिवस रात्र उचलणाऱ्या एन.पी.इन्फ्रा कंपनीने तालुक्यात धुडगूस घातला आहे. इंदापूर तालुक्यात या कंपनीचा खूप मोठा बोलबाला सुरू आहे.

प्रजापती नामक परप्रांतीय व्यक्ती बड्या धेंडांचा बाप झाल्यासारखे वागत आहे. मग्रुरी व अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचा हातखंडा असल्याने त्याच्या वाटेला जाण्याची हिंमत कोणाचीच होत नाही. अनेकांनी कंपनी विरोधात बोलायची हिम्मत केली, मात्र त्यांची तोंडे एका झटक्यात बंद केली. त्यासाठी काहींना राजकीय पॉवर दाखवली गेली.. तर काहींना आर्थिक अमिष दाखवत शांत केले.

आता शेटफळ हवेली गावातील तंटामुक्ती समिती अध्यक्ष संजय शिंदे यांनी एन.पी.इन्फ्रा कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे. शेटफळ हवेली येथील पाझर तलावातील मुरुम उत्खनन करण्याची परवानगी एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्टस् प्रा.लि.यांनी घेतली असून अप्पर जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या शासकीय अटींचे कंपनीने उल्लंघन केले असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. या मागणीचे निवेदन संजय शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी इंदापूर तहसील कार्यालयामध्ये दिले होते.

परंतु सदर निवेदनावरती महसूल खात्याकडून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिंदे यांनी २० सप्टेंबर पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले होते. इंदापूर तहसील कार्यालयाला संजय शिंदे यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शेटफळ हवेली तलावातून ५० हजार ब्रास मुरुम उचलण्यास परवानगी सदर कंपनीने दि. २१/५/२०२४ रोजी घेतली होती. परंतु सदर कंपनीने त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने अवैधरित्या मुरूम उत्खनन केलेले आहे. याची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

सदर कंपनीला सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच मुरुम उचलण्यासाठी परवानगी असताना सदर कंपनीने रात्रंदिवस नियमबाह्य मुरूम उत्खनन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित कार्यान्वीत यंत्रणा व क्षेत्रीय महसूल कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत सदर जागेची मोजणी करुन सिमांकन केलेल्या क्षेत्रामध्येच कंत्राटदारांनी उत्खनन्न करणे बंधनकारक असताना, सदर कंपनीने शेटफळ तलावामध्ये कोठेही स्वमर्जीने नियमबाह्य मुरूम उत्खनन केलेले आहे. 

उत्खनन करून ज्या रस्त्याने वाहतूक केली, त्या रोडचे नुकसान झाले आहे. सदर रोड हा डांबरी असून या रोडवरती पडलेले खड्डे हे डांबर टाकून न बुजवता मुरूम टाकून बुजवलेले आहेत. कंपनीकडून नियमबाह्य पद्धतीने रात्रीच्या वेळी उत्खनन केल्याचे व वाहनातून घेऊन गेल्याचे सर्व व्हिडिओ चित्रीकरण पुरावे आहेत. सदर कंपनीचे मॅनेजर यांनी तालुक्यातील खाजगी वाहने कंपनीच्या नावाखाली चालवून तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुरूम विक्री केली आहे. या मॅनेजर वरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावे. अशी ही मागणी करण्यात आली आहे.

गावातील युवकांनी संबंधित तहसिलदारांना या घटनेची फोनवर माहिती दिली. तसेच तलाठी व सर्कल यांनाही या घटनेची फोनवर माहिती दिली व ११२ या आपत्कालीन नंबरवर कॉल करुन इंदापूर पोलिस स्टेशनलाही माहिती दिली होती. परंतु वरील सर्व अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

संबंधित कंपनी व तिच्या कमिशन कमविणा-या मॅनेजर यांचेवर तसेच या कामांमध्ये वापरण्यात आलेली सर्व वाहने जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी व सदर कंपनीचा परवाना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावा व शासकीय बुडविलेला महसूल शासनाने वसूल करावा. असे त्यांनी या निवेदनामध्ये नमूद केलेले आहे.

Next Post
महाआरोग्य शिबीरात १३ हजार रुग्णांनी केली आरोग्य तपासणी!आरोग्यदूत आमदारांच्या महाआरोग्य शिबीराला मोठा प्रतिसाद!

महाआरोग्य शिबीरात १३ हजार रुग्णांनी केली आरोग्य तपासणी!आरोग्यदूत आमदारांच्या महाआरोग्य शिबीराला मोठा प्रतिसाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group