रोडरोमींओचा बंदोबस्त करण्याच्या पोलिसांना दिल्या सूचना!
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत.आज बारामती मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना सगळ्यात जास्त निधी यंदाच्या पाच वर्षात बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये आला आहे. मेहरबानी करा, पण कामाचा दर्जा चांगला ठेवा. आज माझ्याकडे काही कामे अशी आली की, मी बीडीओलाच विचारलं की हे काय? काम पूर्ण व्हायच्या आधीच पैसे उचलले असं कसं चालेल?
शेवटी हा जनतेचा पैसा आहे. काम दर्जेदार झालं पाहिजे. मी सरपंच आणि सगळ्या प्रमुखांनाही आवाहन करील, मी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि हा निधी देत असताना आम्ही पण काम चेक करणार आहे. अजित पवारांनी असं सांगितलं आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पवार म्हणाले, आता डीपीडीसीला मी बारा ते साडेबारा लाख असा निधी केला आहे. त्याचं नीट टेंडर झालं पाहिजे. त्याची नीट माहिती झाली पाहिजे. बऱ्याचदा त्या गावकऱ्यांना माहितीच नाही की, आपल्या गावात कितीे निधी दिला आणि काय निधी दिला? तिथल्या प्रमुखांनी सांगायला पाहिजे होतं. तिथल्या ग्रामसेवकांनी सांगायला पाहिजे होतं की, ह्या पद्धतीने हा निधी आलेला आहे. आणि तो निधी सत्कारणी लागतोय का?त्याचा योग्य पद्धतीने खर्च केला जातोय का?
कोणीतरी थातूरमातूर काम करून बिल काढतात हे कधीही आपण बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये चालून दिलं नव्हतं. पण काही बाबतीत तक्रारी आल्या आहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, निधी देण्याची जबाबदारी मी तुमचा पाच वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून होती. ते मी मनापासून पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इतरांनाही विनंती आहे. कामे आपापल्या भागातली चांगली आहेत का नाहीत हे बघितलं पाहिजे आणि ती चांगली कशी होतील त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. अस उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्यावेळेस माझ्याकडे डीवायएसपी आणि ॲडिशनल एसपी येतात, त्यावेळी मी त्यांना सांगतो की, माझ्या मतदारसंघात गुंडगिरी कोणीही केलेली चालणार नाही. कुणीही असो माझ्या पक्षाचा जवळचा कोणी असला, तरी मी ते खपवून घेणार नाही असं त्यांना सांगितला आहे. काही रोडरोमिओ फिरतात शारदानगर, विद्यानगरी, टी सी कॉलेज, मएसो हायस्कूल, त्या ठिकाणी फिरताना दिसतात. माझ्या जवळचा जरी कोणी चुकला, तरी मी त्याला मोका लावायला कमी करणार नाही. मी आधीच तुम्हाला सांगतो. अजिबात कोणाची दहशत गुंडगिरी त्या ठिकाणी चालणार नाही. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.











