मालवण : महान्यूज लाईव्ह
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे ला कल्याण मधील त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटे हा काळोखातून आला आणि पोलिसांनी त्याला पकडलं मात्र वकिलांनी वेगळीच स्टोरी सांगितली आहे.
जयदीप आपटे याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. यावेळी त्याची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात कसून चौकशी होईल, मात्र पोलिसांनी शिताफीने म्हणून पकडलेल्या जयदीप आपटेची स्टोरी त्याच्या वकीलांनी वेगळी सांगितल्याने पोलिसांच्या कार्यकर्तृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जयदीप आपटेच्या वकीलांनी पोलिसांनी त्याला पकडलं ही स्टोरी साफ खोटी असून या प्रकरणात गलिच्छ राजकारण केली जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टात जाऊन अटकपूर्व जामीन मांडण्याऐवजी पोलिसांपुढे शरण जाणे आणि तपासणी करायला सहकार्य करणे आम्ही योग्य समजलं. त्यानुसार जयदीप आपटे हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्वतःला शरण येईल आणि पुढची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल असे ठरवले होते. त्यानुसारच सर्व घडलेले आहे. कोणतीही लपाछपी करायची नव्हती. मात्र पोलिसांनी वेगळी स्टोरी रचली.











